शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मातृवंदना योजनेची जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ही योजना तळागाळातील सर्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे, असे मार्गदर्शन केले. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत, असे सांगितले. प्रास्ताविकादरम्यान डॉ. सुनील मडावी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना गडचिरोलीसारख्या मागासवर्गीय जिल्ह्यातील मातांसाठी वरदान ठरणारी आहे.

ठळक मुद्देमहिला बाल रूग्णालयातून सुरूवात : २ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गरोदर माता व नवजात बालकाचे संगोपण व्हावे, यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेची जनजागृती करण्यासाठी महिला व बाल रूग्णालयातून २ डिसेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. २ ते ८ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम राबवून जनजागृती केली जाणार आहे.महिला रूग्णालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ.सुनील मडावी, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बागराज धुर्वे, डॉ. राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अनुपम महेशगौरी आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी मार्गदर्शन करताना ज्या मातांची प्रसुती होऊन सुध्दा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा मातांना प्रसुतीनंतर ४६० दिवसापर्यंत लाभ देता येतो, असे मार्गदर्शन केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ही योजना तळागाळातील सर्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे, असे मार्गदर्शन केले. आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेणार आहेत, असे सांगितले. प्रास्ताविकादरम्यान डॉ. सुनील मडावी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना गडचिरोलीसारख्या मागासवर्गीय जिल्ह्यातील मातांसाठी वरदान ठरणारी आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ‘सुरक्षित जननी विकसीत धारणी’ अशा घोषणा देत महिला व बाल रूग्णालयातून रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक डॉ. सुनील मडावी, संचालन रचना फुलझले, तर आभार आरोग्य सहायक आनंद मोडक यांनी मानले.पाच हजार रुपयांचा मिळतो लाभगरोदरपणात व प्रसुतीनंतर योग्य औषधोपचार, पोषण आहार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने १ सप्टेंबर २०१७ रोजी ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शासकीय आरोग्य संस्थेतील एएनएमकडे मासिक पाळी सुटल्यानंतर १०० दिवसांच्या आत नोंदणी केल्यानंतर हजार रुपये अनुदान बँक खात्यात टाकले जाते. गरोदरपणाच्या सहा महिन्यात किमान एक प्रसुतीपूर्वी तपासणी केली असल्यास दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो. प्रसुतीनंतर प्रसुतीनंतर बाळाची नोंद व बाळाची १४ आठवड्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपये अनुदान असे एकूण पाच हजार रुपये अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे, पहिल्या प्रसुतीवेळी अनुदान मिळते.

टॅग्स :Healthआरोग्य