शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

समाजात धम्माची जागृती करा

By admin | Updated: January 23, 2017 00:57 IST

बुद्धाचा धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गाने जीवन जगल्यास माणसाच्या जीवनातील दु:ख नाहीसे होते.

कोकडीत धम्मपरिषद : भंते कृपाशरण व ई. झेड. खोब्रागडे यांचे बांधवांना आवाहनदेसाईगंज : बुद्धाचा धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गाने जीवन जगल्यास माणसाच्या जीवनातील दु:ख नाहीसे होते. यासाठीच हजारो वर्षांपासून गावकुसाबाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या माणसांना मानवी मूल्यांचा प्रकाश देऊन सन्मानाने जीवन जगायला लावणारा बुद्धाचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. धम्म जागृतीने बाबासाहेबांचे विचार जनमाणसांत रूजवा, असे प्रतिपादन चंद्रपूर येथील भिक्खू संघाचे संघटक भदंत कृपाशरण व सामाजिक विचारवंत ई. झेड. खोब्रागडे यांनी केले. कोकडी येथे त्रिरत्न समता संघ देसाईगंज व बौद्ध समाज कोकडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धम्म परिषदेत मार्गदर्शन करताना भदंत कृपाशरण व ई. झेड. खोब्रागडे बोलत होते. परिषदेदरम्यान तथागत बुद्धांच्या प्रतिमेचे अनावरण ई. झेड. खोब्रागडे यांच्या उपस्थितीत भदंत कृपाशरण यांच्या हस्ते झाले. समता सैनिक दलाच्या वतीने पंचरंगी व निळ्या ध्वजाला वसंत माटे व डेविड शेंडे यांच्या नेतृत्त्वात सलामी देण्यात आली. धम्म परिषदेला आरमोरीचे धर्माजी बांबोळे, लाखांदूरचे दिगांबर मेश्राम, नागपूरचे मिलींद बन्सोड, माजी शिक्षणाधिकारी मेश्राम, विजय बेले, सरपंच मन्साराम बुद्धे, माजी पं. स. सभापती परसराम टिकले, डॉ. पीतांबर कोडापे उपस्थित होते. धम्म परिषदेचे प्रास्ताविक मुख्य प्रवर्तक विजय बन्सोड यांनी केले. त्यांनी धम्म परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. संचालन रामेश्वर चिमणकर तर आभार सचिव एम. ए. रामटेके यांनी मानले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष चंदूराव राऊत, गिरीधर मेश्राम, गौतम लांडगे, सुखदेव खोब्रागडे, घनश्याम बन्सोड, कृपादास मेश्राम, चंद्रशेखर लांडगे यांनी सहकार्य केले. यावेळी बौद्ध समाज कोकडी, त्रिरत्न समता संघाचे पदाधिकारी व कोकडी येथील बहुसंख्य बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)ज्येष्ठ नागरिक व गुणवंतांचा सत्कारधम्म परिषदेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राघोबा शेंडे, अण्णाजी बोरकर, उद्धवराव खोब्रागडे, दादाजी चहांदे, सीताराम राऊत व चोखोबा शेंडे यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी प्रशील राऊत, भागवत टिकले, किरण गभणे, अहेबाजखान पठाण, साजिया शेख, श्वेतांगी जांभुरे, ममता मानकर यांचा तसेच उच्चविद्याविभूषित डॉ. नरेश बन्सोड, डॉ. फिरोज मेश्राम, डॉ. नूपूर बोदेले, डॉ. अश्विनी मेश्राम व आचल घुटके यांचा पालकांसह त्रिरत्न समता संघाच्या वतीने प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.