शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनग्रस्तांची वास्तव्यास टाळाटाळ

By admin | Updated: June 14, 2017 01:51 IST

गाढवी नदीच्या काठावर असलेल्या किन्हाळा व अरततोंडी या गावांना नेहमीच पुराचा फटका बसत होता.

नवीन जागेवर कब्जा : जमीन परत करण्याची जुन्या शेतकऱ्यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर असलेल्या किन्हाळा व अरततोंडी या गावांना नेहमीच पुराचा फटका बसत होता. त्यामुळे या दोन्ही गावांचे पुनर्वसन करण्यात आले. अरततोंडी येथील नागरिकांनी नवीन जागेवर कब्जा केला. मात्र या ठिकाणी येण्यास ते टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आपली जमीन परत करावी, अशी मागणी जुन्या शेतकऱ्यांनी केली आहे. अरततोंडी या जुन्या गावाचे पुनर्वसन चिखली रिठ या हलक्यात करण्यात आले. जुनी अरततोंडी ते पुनर्वसित ठिकाणचे अंतर सहा किमी आहे. पुनर्वसन करताना अरततोंडी येथील नागरिकांना शासनाने घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यानुसार अरततोंडी येथील नागरिकांनी चिखली रिठ येथील जागेवर कब्जा केला. मात्र १९९५ पासून त्यांनी या जागेवर घर बांधले नाही. केवळ दहा ते पंधरा कुटुंब नवीन ठिकाणी पुनर्वसित झाले आहेत. पुनर्वसनाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून शासनाने जमिनी घेऊन त्या ठिकाणी रस्ते, वीज, नाल्या व विहिरीचे बांधकाम केले आहे. प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला घर बांधण्यासाठी प्लाटचे हक्कही देण्यात आले आहेत. घर बांधकामासाठी शासनाने दहा हजार रूपयांची मदत दिली होती व पंधरा हजार रूपये कर्ज देण्यात आले होते. सदर रक्कम सुद्धा या लाभार्थ्यांनी हडप केली आहे. मात्र घर बांधले नाही. शासनाचीही या नागरिकांनी फसवणूक केली आहे. ग्राम पंचायस्तरावरून अरततोंडी गावातच विकास कामे केली जात आहेत. रस्ते, घरकूल सुद्धा जुन्या अरततोंडी येथील नागरिकांना दिले जात आहे. पुनर्वसनासाठी चिखली रिठ येथील चार ते पाच शेतकऱ्यांच्या पट्ट्याची जमीन शासनाने परत घेऊन पुनर्वसित नागरिकांना दिले आहे. एक ते दोन एकर जागेवर दहा ते पंधरा कुटुंब वास्तव्यास आली आहेत. उर्वरित पंधरा ते सतरा एकर जागा आतापर्यंत मोकळी आहे. ज्या शेतकऱ्यांची जागा शासनाने पुनर्वसितांना दिली. ते नागरिक आता भूमिहीन झाले आहेत. आपली जागा आपल्याला परत करावी, यासाठी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. दोन्ही ठिकाणच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या अरततोंडी येथील नागरिकांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घराच्या अनुदानाचीही रक्कम हडपली पुनर्वसन करताना शासनाने १९९५ साली पुनर्वसित नागरिकांना घर बांधकामसाठी दहा हजार रूपयांचे अनुदान व पंधरा हजार रूपये कर्ज दिले. अनेक नागरिकांनी शासनाकडून मिळालेली रक्कम घेतली. मात्र घराचे बांधकाम केले नाही. आता हेच नागरिक जुन्या अरततोंडी येथे घरकुलाचा लाभ घेऊन वास्तव्य करीत आहेत. घरासाठी अनुदान घेऊनही घराचे बांधकाम न करणे ही एक प्रकारची शासनाची फसवणूक आहे. याची चौकशी करण्याची गरज आहे. ग्राम पंचायतही याकडे दुर्लक्ष करून संबंधित नागरिकांना योजनांचा दुबार लाभ देत आहे.