शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण विभागाच्या मंजुरीत अडकला 57 रेतीघाटांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता हे घाट लिलावात काढलेच कसे, असा प्रश्न करत एक जनहित याचिका चामोर्शी येथील पराग आईंचवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यासोबत इतरही जिल्ह्यांमधून अशा याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी बाकी असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच जिल्ह्यांमधील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या नद्यांची आणि चांगल्या प्रतिच्या रेतीची देण लाभलेल्या या जिल्ह्यात रेतीघाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या महसुलाला मात्र काही वर्षात ग्रहण लागले आहे. यावर्षीही तयार असलेल्या ५७ घाटांच्या लिलावाला ऐनवेळी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे २१ कोटींपेक्षा जास्त महसुलाची आस लावून बसलेल्या प्रशासनाला चांगलाच झटका बसला आहे.पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता हे घाट लिलावात काढलेच कसे, असा प्रश्न करत एक जनहित याचिका चामोर्शी येथील पराग आईंचवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. यासोबत इतरही जिल्ह्यांमधून अशा याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावरील सुनावणी बाकी असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच जिल्ह्यांमधील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिल्याची माहिती आहे.विशेष म्हणजे यावर्षी नव्याने लिलाव करण्यासाठी ५७ रेतीघाटांना आयुक्तांकडून मंजुरी मिळाली होती. त्या घाटांना पर्यावरण विभागाने मंजुरी द्यावी यासाठी आधीच प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून त्या प्रस्तावाची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान, २८ जानेवारी २०२२ च्या शासकीय पत्रानुसार घाटांचा लिलाव आधी करा, त्यानंतर पर्यावरण विभागाची मंजुरी घ्या, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच ५७ रेतीघाटांच्या लिलावासाठी निविदा काढली. गुरूवारी (दि.१०) ही निविदा उघडली जाणार होती. मात्र त्याआधीच ही लिलाव प्रक्रिया स्थगित करण्याची सूचना शासनाकडून प्राप्त झाली.गेल्या दाेन वर्षांपासून जिल्ह्यातील रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया उशिरा हाेत असल्यामुळे त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. 

यावर्षीच्या लिलावातून अवघा २.२८ कोटीचा महसूलगेल्यावर्षीच्या लिलावातून शिल्लक राहिलेल्या ११ रेतीघाटांसाठी आधीच लिलाव प्रक्रिया झाली. पहिल्या लिलावात त्या ११ पैकी ३ रेतीघाट गेले. त्यातून २ कोटी २८ लाखांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला. पण त्यानंतर शिल्लक असलेल्या ६ कोटी किंमत असलेल्या ८ घाटांसाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कोणी रेतीघाट घेण्यासाठी पुढे आले नाही. त्या घाटांची मुदत येत्या ३१ मे रोजी संपणार असल्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही.

 

टॅग्स :sandवाळू