शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागाच्या विकासाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:04 IST

उपविभाग धानोरा व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुलभट्टी येथे महाजनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकुलभट्टीत जनजागरण मेळावा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : नक्षल्यांच्या हिंसाचारामुळे दुर्गम भागात मूलभूत सुविधाही पोहोचल्या नव्हत्या. मात्र आता नक्षलवाद्यांचा बिमोड करून या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी विकास साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.उपविभाग धानोरा व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुलभट्टी येथे महाजनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करीत होते. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक मोहित गर्ग, सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ, जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटे, एसडीपीओ विक्रांत गायकवाड, धानोराचे ठाणेदार विवेक अहिरे, मुरूमगावचे प्रभारी पोलीस अधिकारी राजू थोरात, येरकड पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी अंकुश शेलार, ग्यारापत्तीचे प्रभारी अधिकारी रोहण गायकवाड, सावरगावचे ढेरे, कटेझरी पोलीस मदत केंद्राचे गोरडे, पीएसआय सतीश अंडेलवार आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, नक्षलवादी निष्पाप जनतेचा बळी घेतात. ते देशाचे शत्रू आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करू नका. कुलभट्टी येथील नागरिकांना सिंचन, तलाव, हिरंगे ते कुलभट्टीपर्यंतच्या मार्गाचे खडीकरण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन केले. तसेच गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल. उच्च शिक्षणासाठी सुद्धा त्यांना मदत केली जाईल. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. दुर्गम भागातील नागरिकांचा पाठिंबा मिळणे कमी झाल्यास नक्षलवादी चळवळ आपोआप संपुष्टात येईल, असे प्रतिपादन केले.अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन केले.मेळाव्यात धानोरा, मुरूमगाव, सावरगाव, येरकड, कटेझरी, ग्यारापत्ती परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. कुलभट्टी, चव्हेला, केहकावाही येथील नागरिकांनी रेलानृत्य सादर केले. धानोरा उपविभागाअंतर्गत येत असलेल्या आत्मसर्पित नक्षल कुटुंबांना प्रमाणपत्र व सायकलचे वाटप करण्यात आले. प्रगती, प्रयास अंतर्गत गावकऱ्यांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान करण्याची शपथ नागरिकांना यावेळी देण्यात आली.युवकांच्या पार पडल्या विविध स्पर्धामेळाव्यादरम्यान कबड्डी, व्हॉलिबॉल, रेलानृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या संघांना बक्षीस देण्यात आले. तसेच दहावी, बारावीमध्ये प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या मागणीनुसार पाण्याची टाकी, फवारणी पंप, सोलर लाईट, व्हॉलिबॉल, क्रिकेट साहित्य, शिलाई मशीन, मंडपाचे साहित्य, जीमचे साहित्य, साड्या, मच्छरदाणी, स्कूल बॅग, सायकल, ट्रायसिकल आदी साहित्यांचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस