शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

दुचाकीस्वारांना लुटण्याचा प्रयत्न फसला

By admin | Updated: March 22, 2015 00:20 IST

तलवाडावरून आलापल्लीकडे येत असताना दोन दुचाकीस्वारांना रस्त्याच्या मधोमध दोर बांधून जखमी करून लुटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना ...

आलापल्ली : तलवाडावरून आलापल्लीकडे येत असताना दोन दुचाकीस्वारांना रस्त्याच्या मधोमध दोर बांधून जखमी करून लुटण्याचा प्रयत्न फसल्याची घटना गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भामरागड-आलापल्ली मार्गावर घडली. या घटनेत दुचाकी खाली कोसळल्याने मल्लेश तोटावार (४०) व राकेश ऊरेत (२२) हे दोघेजण जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार मलेश तोट्टावार हे तलवाडा येथील विनोबा आश्रमशाळेत रूग्णवाहिकेवर वाहक पदावर कार्यरत आहेत. राकेश ऊरेत व महेश तोटावार हे दोघे जण गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तलवाडावरून आलापल्लीकडे येत होते. अज्ञात इसमांनी मुख्य मार्गावर नाल्याजवळ रस्त्याच्या दुतर्फा नायलॉन दोरी बांधून ठेवली होती. रात्रीची वेळ असल्यामुळे दुचाकीचालक महेश तोटावार यांना ही नायलॉन दोरी दिसली नाही. दरम्यान दोरीमुळे दुचाकीवरील दोघेहीजण खाली कोसळले. मल्लेश तोटावार याच्या गळ्यात बांधून ठेवलेली दोरी अडकली. तेवढ्यात या मार्गाने एक चारचाकी वाहन आले. या वाहनातील नागरिकांनी या दोघाही जखमींना उचलून आजूबाजूला शोधाशोध केली असता या परिसरात कोणीही आढळून आले नाही. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)