शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचा प्रयत्न; दोन अल्पवयीन आरोपींना अटक, सात फरार; मुडझा येथील घटना

By दिलीप दहेलकर | Updated: June 16, 2023 21:05 IST

अल्पवयीन आरोपींची ग्रामस्थांकडून धरपकड

गडचिरोली -जुन्या क्षूल्लक वादातून गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही युवकांनी शहरापासून जवळच असलेल्या मुडझा येथील एका युवकाचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांना अटक केली आहे. तर याप्रकरणी आणखी सात आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी फरार आरोपींमध्ये राजेंद्र ऊर्फ गोलू संपन मंडल रा. कुनघाडा ता. चामोर्शी, नकुल भोयर रा. चामोर्शी, मुस्तफा पठाण रा. कुनघाडा या चार आरोपींचा समावेश आहे. उर्वरीत आरोपींची उशिरापर्यत नावे कळू शकली नाहीत.

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या मुडझा येथील समीर चौधरी या युवकासोबत कुनघाडा येथील अल्पवयीन मुलाचा जुना वाद होता. या कारणातूनच गुरुवारी रात्रीच्या सुमारास मोबाईलवरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. या विवादातून अल्पवयीन आरोपीने समीरचे अपहरण करण्याची धमकी दिली. दरम्यान गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास 9 आरोपी वाहनात बसून मुडझा येथे पोहचले. गावात पोहचून त्यांनी समीरचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. वाहनातून बराच वेळ त्याला फिरविल्यानंतर आरोपींना त्याला परत गावात आणून सोडले. दरम्यान गावातील नागरिकांना याची माहिती होताच यातील दोन अल्पवयीन आरोपींना पकडून घेतले. तर उर्वरीत आरोपी वाहनातून पळून जाण्यात यशस्वी झाले. गडचिरोली पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. 

अल्पवयीन आरोपींची ग्रामस्थांकडून धरपकडमुझडा येथील समीर चौधरी याचे अपहरण करण्यासाठी आलेल्या 9 आरोपींपैकी एका अल्पवयीन आरोपीस ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडले. घटनेची माहिती तत्काळ गडचिरोली पोलिसांना देताच पोलिसांनी तत्परता दाखवित घटनास्थळ गाठले. घटनेची संपूर्ण माहिती घेत पोलिसांनी दुस-या अल्पवयीन बालकासही तत्काळ अटक केली. दोन्ही आरोपी बालकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करीत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक तोटेवार करीत आहेत.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी