शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
4
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
5
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
6
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
7
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
8
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
9
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
10
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
11
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
12
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
13
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
14
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
15
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
16
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
17
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
18
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
19
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 

अतिक्रमण कायमच !

By admin | Updated: May 3, 2015 01:11 IST

वाहनावरील नियंत्रण सुटणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, ....

गडचिरोली : वाहनावरील नियंत्रण सुटणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, वाहनामध्ये बिघाड आदी कारणामुळे राज्य महामार्गावर अपघात होत असतात. मात्र शहरात चालकांचा काहीही दोष नसतांना वेगळ्याच कारणाने अपघात वाढले आहेत. शहरातील चारही मुख्य मार्गावर दुकानदारांनी आपल्या दुकानातील सामान ५ ते १० फुटाच्या अंतरावर बाहेर काढून ठेवतात. यामुळे रस्ता अरूंद होत असून शहरात अपघाताची मालिका वाढली आहे. अतिक्रमणाच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. मात्र याकडे स्थानिक नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.रस्ता दुभाजकावरील पथदिव्याचे अनेक खांब वाकले आहेत. दुभाजकही ३० ते ३५ फुट अंतरापर्यंत तुटले आहे. यामुळे पालिकेचेही नुकसान झाले. रस्ता दुभाजकावर वाहन चढल्याची पहिली घटना नाही. यापूर्वी चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयासमोर एक ते दोन ट्रक दुभाजकावर चढले. तसेच कारही दुभाजकावर चढली. धानोरा मार्गावरील लांझेडा परिसरात ट्रक दुभाजकावर चढला. आरमोरी मार्गावरही वाहन दुभाजकावर चढले.शहरातील चारही मुख्य मार्गावरील दुभाजकाला वाहनांची धडक बसली आहे. लाखो रूपये खर्च करून नगर पालिका प्रशासनाने दुभाजक उभारले. मात्र त्यापूर्वी अतिक्रमणाची समस्या मार्गी लावली नाही. तसेच या मार्गावरील मोठे व्यावसायिक आणि फुटपाथ दुकानदारांना अतिक्रमण न करण्याबाबत तंबी दिली नाही. परिणामी दुकानदारांनी चारही मुख्य मार्गावर अतिक्रमण करून अर्धा रस्ता काबिज केला आहे. दुभाजकापासून रस्त्यापर्यंतची रूंदी केवळ १५ फुट उरली असून एवढ्याशा रस्त्यावरून एका वेळेस फक्त एकच चारचाकी वाहन जाऊ शकते. सध्या शहरात आवागमण करणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शाळकरी मुलेही सुसाट वेगाने वाहने चालवित आहेत. यामुळे शहरात रोजच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. नियमबाह्य वाहतुकीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नाही. येथील इंदिरा गांधी चौकात दुपारच्या सुमारास वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अनेक वाहनचालक ट्रिपल सीट, अल्पवयीन शाळकरी मुली तसेच मुले सुसाट वेगाने वाहने चालवित आहेत. आजमितीस शहरात वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविले असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)