शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

12 हजार 240 शेतकऱ्यांना देणार 50 हजारपर्यंत मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 21:59 IST

महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेबाबत २९ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सन २०१७-१८, सन २०१८-१९ व सन २०१९-२० या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त ५० हजार रुपयेपर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पीककर्जाची नियमित परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये किंवा २०१९-२० या वर्षात जेवढे पीककर्ज घेतले आहे, तेवढी रक्कम दिली जाणार आहे. दाेन टप्प्यात मदतीचे वितरण केले जाणार आहे. १२ हजार २४० शेतकऱ्यांची पहिली यादी १३ ऑक्टाेबर राेजी प्रकाशित झाली आहे. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गाेड हाेणार आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेबाबत २९ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सन २०१७-१८, सन २०१८-१९ व सन २०१९-२० या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त ५० हजार रुपयेपर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तीन वर्षांपैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे, त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयीकृत व खासगी बँका यांनी या योजनेस पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी विशिष्ट क्रमांकासह १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

नाव नसेल तर घाबरू नका -    पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. 

यादी बघण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी पात्र शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत, विकास संस्था येथे प्रसिद्ध करण्यात येणार हाेती. मात्र, अनेक ग्रामपंचायतींपर्यंत यादी पाेहाेचलीच नाही. शनिवारी शासकीय कार्यालये बंद हाेती. मात्र, बॅंका सुरू हाेत्या. त्यामुळे यादीत आपले नाव आहे काय, हे बघण्यासाठी शेतकऱ्यांनी बॅंकांमध्ये गर्दी केली हाेती. 

 आधार प्रमाणीकरण करा 

पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी आधार प्रमाणिकरण आवश्यक आहे. 

-आधार क्रमांक किंवा त्याच्या कर्जाची रक्कम चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावी. प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, तर तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जGovernmentसरकार