लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी-मुलचेरा मार्गावर सोमवारी वनवा लागला होता. या वनव्यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे.पानझड लागल्यानंतर तसेच मोहफूल वेचण्यास सुरूवात झाल्यानंतर जंगलांनाआगी लागण्याचे प्रकार वाढतात. आगीमुळे कित्येक हेक्टरवरील जंगल जळून खाक होते. यामध्ये वनव्याच्या आगीत लहान वृक्ष, पक्षांचे घरटे, पक्षांचे पिल्लू यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वनव्याने जैवविविधतेचे मोठे नुकसान होते. वनवा लागू नये, यासाठी वन विभागामार्फत अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी वनवा थांबविण्यात वन विभागाला यश प्राप्त झाले नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी वन विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर दिला. मात्र अजुनही वनवा लागण्याच्या घटना घडतच आहेत.आॅक्टोबर महिन्यानंतर पाऊस झाला नाही. त्यामुळे जंगलातील गवत करपले आहे. परिणामी एका ठिकाणी लागलेली आग सुकलेल्या गवताच्या मदतीने चोहिकडे पसरते. यावर्षी आगी लागण्याच्या घटनांमध्ये तसेच वनव्याच्या क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे. पुन्हा एक महिना वनवा लागण्याच्या घटना घडणार आहेत. यावर अंकूश ठेवणे आवश्यक आहे.
आष्टी-मुलचेरा मार्गावर वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:16 IST
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : आष्टी-मुलचेरा मार्गावर सोमवारी वनवा लागला होता. या वनव्यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. पानझड ...
आष्टी-मुलचेरा मार्गावर वणवा
ठळक मुद्देजैवविविधतेचे नुकसान : जनजागृतीचे प्रयत्न अयशस्वी