शासकीय आश्रमशाळेत स्थायी स्वरुपात काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जागी ठेका पद्धतीने कामगारांना नियुक्त करण्यात आले. गडचिराेली, अहेरी व भामरागड प्रकल्पात ३०० हून अधिक कंत्राटी कामगार, स्वयंपाकी, कामाठी, सफाईगार व चाैकीदार काम करीत आहेत. काेराेनाचे कारण दाखवून मागील वर्षी सर्व कंत्राटी कामगारांना मार्च २०२० पासून कामावरुन बंद करण्यात आले. मात्र जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यात कामगारांकडून काम करवून घेतले. परंतु एक वर्षाचा कालावधी उलटूनही त्यांना कामाचा माेबदला मिळाला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चतुर्थ श्रेणी आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमाेर निदर्शने करुन प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन दिले. या निवेदनात, कंत्राटी कामगारांना थकीत मानधन द्यावे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सहा वर्षांपासून गणवेश दिले नाही. गणवेश वितरित करावे, कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आदेश द्यावे आदी मागण्यांचा समावेश हाेता. याप्रसंगी लवकरच थकीत वेतन देण्यात येईल, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. अहेरी व भामरागड प्रकल्प कार्यालयानेही लवकर कामगारांचे मानधन निकाली काढावे, अशी मागणी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे.
आश्रमशाळा कामगारांचे मानधन थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST