गडचिरोली : मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अशोक पाटील मुनघाटे यांनी भारतीय जनता पक्षात बुधवारी प्रवेश केला. खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.पक्ष प्रवेशाच्या वेळी रमेश भुरसे, विलास भांडेकर, आनंद शृंगारपवार, अनिल कुनघाडकर, श्रीकृष्ण कावनपुरे, पांडुरंग समर्थ आदी उपस्थित होते. तर भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली तालुका उपाध्यक्ष सुरेश लक्ष्मण कोलते यांनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ३१ जानेवारी रोजी प्रवेश केला. पक्षाच्या गडचिरोली येथील कार्यालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पं. स. च्या माजी सभापती सविता कावळे, राजू कावळे, डंबाजी ठाकरे, रामचंद्र वाढई, लता कावळे, मंगला कावळे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
अशोक मुनघाटेचा भाजपात तर सुरेश कोलतेचा राकाँत प्रवेश
By admin | Updated: February 3, 2017 01:19 IST