शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल लागताच वाढला उकाडा, कूलर, एसी दुरुस्त करा हाे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

 उन्हाच्या तीव्रतेमुळे वर्षभर घरात पडून असलेले कूलर नागरिकांनी काढण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर एवढ्या लवकर न दिसणारे कूलर, पंखे दुरुस्ती कामाची लगबग वाढली आहे. वर्षभर कूलर बंद राहत असल्याने कूलर सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिक कारागिरांच्या मागे धावत आहेत. यामुळे कूलर, पंखे दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना सद्य:स्थितीत मात्र अच्छे दिन आले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षी जवळपास एप्रिल महिन्यानंतर गावखेड्यातील कूलर सुरू करण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागल्याने अडगळीत पडलेले कूलर दुरुस्तीकरिता नागरिकांची लगबग वाढली आहे. एरव्ही जून महिन्यात उष्णतेची सर्वांत जास्त झळ बसत असते. मात्र, मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ हाेत असल्याचे दिसून येत आहे. यातही मार्च महिन्यातच उन्हाची काहिली जाणवण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी जवळपास मे-जून महिन्यांत तापमान अगदी शिगेला पोहोचते. त्यामुळे गर्मीपासून संरक्षण करण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात कूलर, पंख्याचा वापर या कालावधीत सुरू होतो. मात्र, यावर्षी ऊन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाच्या लहरीपणामुळे नागरिक धास्तावले आहेत.  उन्हाच्या तीव्रतेमुळे वर्षभर घरात पडून असलेले कूलर नागरिकांनी काढण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर एवढ्या लवकर न दिसणारे कूलर, पंखे दुरुस्ती कामाची लगबग वाढली आहे. वर्षभर कूलर बंद राहत असल्याने कूलर सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिक कारागिरांच्या मागे धावत आहेत. यामुळे कूलर, पंखे दुरुस्त करणाऱ्या कारागिरांना सद्य:स्थितीत मात्र अच्छे दिन आले आहेत.यावर्षी कुलर दुरूस्ती व विविध सुटे पार्टला अधिक पैसे माेजावे लागत आहेत. दाेन वर्ष काेराेनाचे संकट असल्याने अनेकांवर बेराेजगारीची संकट काेसळले. व्यवसाय डबगाईस आले. दरम्यान यातून भरून निघण्यासाठी काही कारागिरांनी आपल्या मजुरीचे दर वाढविले आहेत. पेट्राेल व डिझेल दरवाढीमुळे पंखे, कुलर साहित्याच्या वाहतुकीचा खर्च वाढला आहे. 

कामाचे वेळापत्रक कोलमडले-    गावखेड्यात नागरिक उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सकाळी ७ वाजतापासून दुपारी दीड वाजेपर्यंत शेतात काम करायचे. मात्र, यावर्षी उन्हाचा पारा शिगेला पोहोचल्याने,  शेतमजूर, गवंडी कामगारांची लाही होत आहे. अक्षरश: अंग पोळून निघण्यासारखे ऊन तापत असल्याने शेतकरी, मजुरांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे.  उन्हाच्या तडाख्याने शेतमजुर व बांधकाम मजुरही सकाळी लवकर कामावर जात आहेत. 

गुरेढोरेही सावलीच्या आडोशाला-    वाढत्या तापमानाची झळ मानवासह पशु, पक्षी, वन्यप्राण्यांना बसू लागली आहे. वाढत्या तापमानामुळे गुरेढोरेही रानात चरण्यापेक्षा सावलीचा आडोसा घेण्याला अधिक पसंती देत आहेत. आतापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्याने येत्या काळात रानातील विहिरींना, पाणवठ्यावर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणांवर गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

 

टॅग्स :Summer Special Shoppingसमर स्पेशल शॉपिंगTemperatureतापमान