शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठात तब्बल १.४६ काेटींचा आर्थिक गैरव्यवहार उजेडात

By दिलीप दहेलकर | Updated: June 5, 2024 23:08 IST

तीन लिपिकांना पाेलिस काेठडी : देयकाची रक्कम स्वत:च्या खात्यात वळवली, विद्यापीठाने यासंबंधी चौकशी केली असता १.४६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले.

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त विभागात कार्यरत तृतीय श्रेणी तीन लिपिकांनी सिनेट सदस्य, विविध प्राधिकरणांचे सदस्य तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्यांच्या देयकाची रक्कम संबंधितांच्या बॅंक खात्यात वळती न करता स्वत:च्या खात्यात वळती करून १.४६ काेटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उजेडात आले. दरम्यान, तक्रारीच्या अनुषंगाने गडचिराेली पाेलिसांनी तीनही लिपिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. जिल्हा न्यायालयाने ५ जून राेजी या आराेपींना १० जूनपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

विद्यापीठाने यासंबंधी चौकशी केली असता १.४६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. याबाबत पोलिस स्टेशन, गडचिरोली येथे तक्रार दाखल करण्यात आली. या गैरव्यवहाराची बाब निदर्शनास येताच विद्यापीठ प्रशासनाने योग्य ती पावले उचलत संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही केली असून संबंधित तीनही लिपिकांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

महेंद्रकुमार उसेंडी (३७), अमित जांभुळे (३८), अमाेल रंगारी (३६) व प्रिया पगाडे या चार आराेपी लिपिकांवर गडचिराेली पाेलिसांनी भादंविचे कलम ४२०, ४०९ आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला. यापैकी प्रिया पगाडे वगळता इतर तीन लिपिक पाेलिस काेठडीत आहेत, अशी माहिती गडचिराेलीचे पाेलिस निरीक्षक अरूण फेगळे यांनी ‘लाेकमत’शी बाेलतांना दिली. मोठ्या रकमेचा हा अपहार उजेडात आल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे.

चार जणांच्या ९ खात्यात टाकली रक्कमकोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आराेपी महेशकुमार उसेंडी यांची स्वत:च्या नावाची सहा खाती आहेत. तर तीन लिपिकांची प्रत्येकी एक असे तीन खात्यात रक्कम वळती करण्यात आली. प्रवास भत्त्याच्या देयकाची रक्कम एकूण ९ खात्यात वळती करण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या दाेन वर्षांत या ९ खात्यात एकूण १.४६ काेटी रुपये वळते करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने गडचिराेली पाेलिस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.