शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युवा केंद्राच्या लेखापालास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:15 IST

गडचिरोली येथील नेहरू युवा केंद्राचा लेखापाल अखिलेश मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने बुधवारी अटक केली आहे. रात्रभर गडचिरोली पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला नागपूरला नेण्यात आले.

ठळक मुद्देसीबीआयची कारवाई : सात हजारांची घेतली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथील नेहरू युवा केंद्राचा लेखापाल अखिलेश मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने बुधवारी अटक केली आहे. रात्रभर गडचिरोली पोलिसांच्या लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुरूवारी सकाळी त्याला नागपूरला नेण्यात आले.नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवा मंडळांना जनजागृतीपर कार्यक्रम दिले जातात. युवा मंडळाने केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी मिश्रा याने सात हजार रुपयांची मागणी युवा मंडळाच्या संचालकास केली होती. मात्र युवा मंडळाच्या संचालकाने याबाबतची तक्रार सीबीआयकडे केली. त्यानुसार सीबीआयने बुधवारी सापळा रचून मिश्रा याला सात हजार रुपयांची लाच घेताना त्याच्या कार्यालयातच रंगेहात पकडले. नेहरू युवा केंद्र हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने युवा मंडळाच्या संचालकाने नागपूर सीबीआयकडे तक्रार केली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.नेहरू युवा केंद्रात जिल्हा समन्वयक हे मुख्य पद आहे. मात्र या पदावर नेहमी प्रभारी व्यक्तीची नियुक्ती राहात असल्याने गडचिरोली नेहरू युवा केंद्राचा पूर्ण कारभार मिश्रा स्वत:च सांभाळतो. अनेक कार्यक्रम कागदावर दाखवून निधी हडपला जात असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. ज्या स्वयंसेवी संस्थांना काम उपलब्ध होते त्यांच्याकडून पैशाची मागणी करीत असल्याने स्वयंसेवी संस्थांचे संचालक त्रस्त झाले होते.नियम डावलून आपल्या मर्जीतीलच संस्थांना कामे देत असल्याने इतर संस्था संचालकांचा मिश्रा याच्यावर मागील काही वर्षांपासून चांगलाच रोष होता.२६ हजाराच्या बिलासाठी १० हजारांची मागणीतक्रारकर्त्या युवा मंडळाने जनजागृतीपर कार्यक्रम केले होते. त्याबाबतचे बिल २६ हजार रूपयांचे होते. विशेष म्हणजे मिश्रा याने २६ हजार रूपयांचे बिल संबंधित युवा मंडळाच्या खात्यात जमा केल्यानंतर युवा मंडळाच्या संचालकाकडून मिश्रा याने तब्बल १० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी सात हजार देण्याचे ठरले. लाचेची मागणी ही एकूण बिलाच्या ३८.४६ टक्के आहे. १० हजारांची लाच दिल्यानंतर युवा मंडळाकडे केवळ १६ हजार रूपये राहात होते. १६ हजार रूपयांत युवा मंडळ कार्यक्रम कसा काय राबविणार? असा प्रश्न निर्माण होतो.कारभाराची चौकशी करानेहरू युवा केंद्रामार्फत दरवर्षी मानधन तत्त्वावर स्वयंसेवकांची नेमणुक केली जाते. मात्र त्यांचीही नेमणुक पैसे घेतल्याशिवाय करीत नव्हता, असा आरोप माजी स्वयंसेवकांनी केला आहे. विशेष म्हणजे मिश्रा हा गडचिरोली येथे मागील १० वर्षांपासून कार्यरत होता. अनेकवेळा बदली होऊनही त्याने बदली रद्द केली आहे. मागील १० वर्षातील आर्थिक व्यवहारांची चौकशी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग