लाॅकडाऊन, संचारबंदी, टाळेबंदी या सगळ्या गोष्टींचा त्रास सर्वांना होत असला तरी तो त्रास सहन करून कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी व संसर्ग साखळी तोडण्यासाठी लोक घरीच राहणे पसंद करीत आहेत. मात्र, तरीही काही लोक याबाबत फारसे गंभीर दिसत नाही. वेगवेगळे कारण दाखवून विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट घातक असल्याने तालुक्यातील, शहरातील अनेक लोकांना मृत्यूच्या दाढेत जावे लागले. त्यामुळे अनेकांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोरोनापासून बचावासाठी शासन, प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाच्या संकटाचा योग्य पद्धतीने सामना करा, असा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.
(बॉक्स)
आतापर्यंत १५४९ जणांना लागण
- आजपर्यंत आरमोरी तालुक्यात १५४९ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ११२३ लोकांनी कोरोनावर यशस्वी मात करून विजय मिळविला आहे. मात्र, ५० जणांनी कोरोनाशी लढताना आपला जीव गमावला. ३७६ कोरोनाबाधितांवर आजही जिल्हा रुग्णालय, तालुक्याचे कोविड केअर सेंटर आणि काहींवर घरी उपचार सुरू आहेत.
- आरमोरी येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तरीही आरमोरी तालुक्यातून दररोज ३० ते ४० वर कोरोनाबाधितांची भर पडत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.