शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
5
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
6
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
7
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
8
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
9
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
10
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
11
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
12
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
13
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
14
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
15
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
16
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
17
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
18
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
19
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
20
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

आरमोरी पं. स. वर सभापती कुणाचा?

By admin | Updated: March 4, 2017 01:13 IST

नुकत्याच पार पडलेल्या पं. स. निवडणुकीत आरमोरी पंचायत समितीच्या एकूण ८ जागांपैकी काँग्रेस पक्षाने ४,

काँग्रेस की भाजपचा? : सत्तेसाठी शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार महेंद्रकुमार रामटेके  आरमोरी नुकत्याच पार पडलेल्या पं. स. निवडणुकीत आरमोरी पंचायत समितीच्या एकूण ८ जागांपैकी काँग्रेस पक्षाने ४, भाजपने ३ व शिवसेनेने १ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आरमोरी पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सभापती कुणाचा होणार याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या एका सदस्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आरमोरी पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झालेले आहे. काँग्रेसकडे सिर्सी पं. स. गणातून निवडून आलेल्या बबीता उसेंडी या एकमेव दावेदार आहेत. तर भाजपाकडे इंजेवारी पं. स. गणातून निवडून आलेल्या रूपमाला वट्टी या एकमेव दावेदार आहेत. आरमोरी पंचायत समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पं. स. निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत नाही. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला एका सदस्याची गरज भासत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच आरमोरी तालुक्यात सुद्धा पंचायत समितीवर आपला झेंडा फडकविण्यासाठी काँग्रेससह भाजपनेही कंबर कसली आहे. आरमोरी पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी ५ सदस्यांची गरज आहे. काँग्रेसकडे ४ सदस्य संख्या असली तरी त्यांना शिवसेनेच्या एका सदस्याची गरज आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेस व शिवसेनेची युती झाली तर काँग्रेसचा सभापती व शिवसेनेचा उपसभापती बनू शकतो. भाजपचे पं. स. चे तीन सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला तरी त्यांची संख्या ४ वर पोहोचेल. तरी सुद्धा भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत होत नाही. जर सेनेने भाजपला पाठिंबा देऊ केला तर भाजपचे ४ व काँग्रेसचे ४ असे सारखेच गणित जुळते आणि असे झाले तरी ईश्वरचिठ्ठीशिवाय पर्याय उरणार नाही. १० वर्षांपूर्वी आरमोरी पं. स. मध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी जेव्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ईश्वरचिठ्ठीत काँग्रेसचे बगुजी ताडाम हे आरमोरी पं. स. चे सभापती झाले होते. काँग्रेस आणि भाजपला एका सदस्याची गरज असल्याने सत्ता स्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार असून शिवसेना सध्या तरी किंगमेकरच्या भूमिकेत आहे. आरमोरी पं. स. च्या २० व्या सभापती पदाच्या निवडीचे काँग्रेस आणि भाजपलाही वेध लागले आहे. आरमोरीत पं. स. वर आपली सत्ता टिकवून ठेवायची आहे. तर भाजपला सेनेच्या मदतीने आपला झेंडा फडकवायचा आहे. सध्यास्थितीत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस दावेदार ठरू शकते. शिवसेना जर काँग्रेससोबत गेली तर काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. शिवसेनेचे सदस्य यशवंत सुरपाम यांच्याभोवती सध्या निर्णय फिरत आहे.