शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी, देसाईगंजात कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:23 IST

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात ३०० कर्मचारी गावागावात फिरून नवीन कुष्ठरुग्ण शोधत आहेत.

ठळक मुद्दे३०० कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती : औषधोपचारासह दिली जातेय माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी/देसाईगंज : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत आरमोरी व देसाईगंज तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात ३०० कर्मचारी गावागावात फिरून नवीन कुष्ठरुग्ण शोधत आहेत. शिवाय नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे, त्यावरील उपाययोजना व करावयाची तपासणी आदीबाबतची माहिती देऊन जनजागृती केली जात आहे.आरमोरी तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम २४ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ९ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. आशा स्वयंसेविका व क्षेत्र कर्मचारी मिळून एकूण ११८ जणांची चमू या कामात लागली आहे.कर्मचारी घरोघरी जाऊन कुष्ठरोगाची माहिती नागरिकांना देत आहे. कुष्ठरोगाची लक्षणे, त्यावरील उपाय, शारीरिक तपासणी, सल्ला व मार्गदर्शन आदीबाबत जनजागृती केली जात आहे. कुष्ठरोग निर्मूलन अभियान यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी तर सचिव तालुका आरोग्य अधिकारी आहे. याशिवाय वैद्यकीय अधीक्षक, गटशिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, कुष्ठरोग संघटना, आशा समन्वयक आदींचा समितीत समावेश आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेत कुष्ठरोगाचे ओपीडी कार्ड देण्यात आले असून नजीकच्या काळात नागरिकांनी शरीरावर कुठलेही चट्टे आढळल्यास आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात दर शुक्रवारी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आनंद ठिकरे, कुष्ठरोग तंत्रज्ञ विनोद ठेंगरी, तालुका आरोग्य सहायक सुरेश दोनाडकर यांनी केले आहे. कुष्ठरोग शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ.वाघधरे, डॉ.मडावी, डॉ.बन्सोड, डॉ.अवटे व आरोग्य कर्मचारी सहकार्य करीत आहेत.देसाईगंज तालुक्यात कुष्ठरोग मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी भागासाठी ८९ चमू कार्यरत असून यामध्े १७८ सदस्य सहभागी आहेत. आशा स्वयंसेविका, क्षेत्र कर्मचारी, पुरुष स्वयंसेवक हे अभियान कालावधीत रोज घरोघरी जाऊन कुष्ठरोगाची माहीती, लक्षणे, उपाय याबाबत शास्त्र शुध्द माहिती देत आहेत. गृहभेटीतून शारीरिक तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करून कुष्ठरोगाचे संशयीत रुग्ण शोधत आहेत.अभियान काळात प्रत्येक गाव व शहरामध्ये कुष्ठरोग विषयी स्टिक्कर लावण्यात येत असून विविध माध्यमातून जनजागृती सुरू केलेली आहे. सेवा केंद्रातून तपासणी करून घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉ.ईकबाल शेख, कुष्ठरोग तंत्रज्ञ दिनकर संदोकर यांनी केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ.अभिषेक कुंभरे, डॉ.अशोक गहाणे, डॉ.पी.जी. सडमेक, डॉ.यशश्री लीमजे यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य