ंलोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील नागरिकांनी गावातून जाणारे रेतीचे ट्रक अडवून चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनादरम्यान एका महिलेने रॉकेल अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला असता, सिरोंचा पोलिसांनी १८ नागरिकांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.आरडा गावाजवळूनच नदी वाहते. या नदीतील रेतीघाटाचा लिलाव झाला असून ट्रकच्या सहाय्याने रेतीची वाहतूक केली जात आहे. या जड वाहतुकीमुळे आरडा व राजन्नापल्ली या गावातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याच्या बाजूलाच लोकवस्ती असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. धुळीचाही त्रास वाढला होता. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांचा गावातून ट्रक वाहतुकीस विरोध होता.राजन्नापल्लीच्या पूर्व दिशेला गावाबाहेरून एक रस्ता आहे. परंतु या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण हटवून या मार्गाने रेतीची वाहतूक करावी, याबाबतचे पत्र २२ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना दिले होते. परंतु महसूल विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे आरडा गावातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून चक्काजाम आंदोलन केले. याबाबतची माहिती पोलिसांनी घटनास्थळ गाठून गावकºयांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते. त्यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिरोंचा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले.ताब्यात घेतलेल्या नागरिकांमध्ये श्रीनिवास रंगू, मलन्ना रंगू, किष्टय्या रंगू, किरण येतम, सूरज रंगुवार, नागेश पसुला, पूनम नन्नेबाईना, नागेश रंगू, दुर्गन्ना रंगू, पोचमल्लू चवला, दुर्गन्ना रंगुवार, भावना रंगू, लक्ष्मी रंगू, वनमाला रंगू, ईश्वरी बैकन, सपना मारगोनी, नागलक्ष्मी कोंडरा, रमा रंगू यांचा समावेश आहे. आंदोलनानंतर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
आरडावासीयांनी अडविले ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:20 IST
तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील नागरिकांनी गावातून जाणारे रेतीचे ट्रक अडवून चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनादरम्यान एका महिलेने रॉकेल अंगावर टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला
आरडावासीयांनी अडविले ट्रक
ठळक मुद्देजड वाहतुकीने रस्ते खराब : महिलांसह १८ जण ताब्यात