शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

कबड्डी स्पर्धेत अर्जुनी मोरगाव अव्वल

By admin | Updated: December 18, 2015 02:03 IST

गडचिरोली लोकसभा क्षेत्र युवक कॉंग्रेसच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारपासून सुरु झालेल्या रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचा समारोप बुधवारी झाला.

युवक काँग्रेसतर्फे रात्रकालीन क्रीडा : कोरचीच्या दोन संघांनी पटकाविले द्वितीय व तृतीय बक्षीसगडचिरोली : गडचिरोली लोकसभा क्षेत्र युवक कॉंग्रेसच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारपासून सुरु झालेल्या रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचा समारोप बुधवारी झाला. या स्पर्धेत अर्जुनी मोरगाव संघ विजेता ठरला असून वनश्री कोरची संघ उपविजेता तर वनश्री कोरची (अ) संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या तिन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.समारोप व बक्षीस वितरण सोहळ्याचे उद्घाटन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते झाले. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, प्रदेश युवक कॉंग्रेसचे कुणाल राऊत, अजितसिंग, नगर परिषदेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, उपाध्यक्ष रमेश चौधरी, बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, नियोजन सभापती विजय गोरडवार, जि. प. सदस्य केसरी पाटील उसेंडी, पंकज गुड्डेवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अरुण निंबाळकर, देवराव राठोड, प्रभाकर वासेकर, प्रकाश ताकसांडे, सतीश विधाते, रामकिरीत यादव, गडचिरोली लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, नंदू वाईलकर, मनोज पवार, प्रवीण मुक्तावरम आदी उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करतांना माजी आ. डॉ. उसेंडी म्हणाले, कबड्डी हा खेळ आरोग्यासाठी लाभदायक असून आता हा खेळ लुप्त होत चालला आहे. जिकडेतिकडे केवळ क्रिकेट शौकिन दिसत आहेत. या खेळाला महत्त्व प्राप्त करुन देण्यासाठी गडचिरोली युवक कॉंग्रेसच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करुन खेळाडूंना एक व्यासपिठ उपलब्ध करुन दिले आहे, असे प्रतिपादन केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले. कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रजनिकांत मोटघरे, सौरभ मुनघाटे, अमोल भडांगे, नितेश राठोड, राकेश गणवीर, प्रतीक बारसिंगे, जीवन कुत्तरमारे, बाळू मडावी, राकेश रत्नावार, तौफिक शेख, अभिजीत धाईत, विवेक धोंगडे, राहूल मुनघाटे, नितेश बाळेकरमकर, गणेश कुळमेथे, तुषार कुळमेथे, वृषभ खैरे, वृषभ धुर्वे, राकेश गरपल्लीवार आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)