शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरचीतील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:40 IST

कोरची या तालुकास्थळावरील मुख्य तसेच शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. परिणामी रस्त्यांची रूंदी कमी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.

ठळक मुद्देरहदारीस अडथळा : नगर पंचायतीचे अभय असल्याचा नागरिकांकडून होत आहे आरोप

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची या तालुकास्थळावरील मुख्य तसेच शहरातील रस्त्यांवर नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. परिणामी रस्त्यांची रूंदी कमी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. भविष्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन रस्ते मोकळे करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.कोरची ग्रामपंचायत असताना १९९२ मध्ये कोरची तालुक्याची निर्मिती झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कोरची हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने वाहतुकीसाठी अरुंद असलेले रस्ते रूंदीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सूचना केल्या. रस्त्यांचे रुंदीकरण करावे असे आदेश सन १९९४ साली निर्गमित केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने भूमी अभिलेख कार्यालय, तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या हालचाली सुरू केल्या. रस्त्याच्या मध्यभागापासून साडेबारा मीटर जागा सोडावी, या जागेत बांधकाम असल्यास ते काढले जाईल, असे नोटीसमध्ये बजावले होते. तेव्हापासून रस्त्याच्या कडेला असलेल्या घरमालकांनी साडेबारा मीटर जागा सोडून घरांचे बांधकाम केले. मात्र काही नागरिकांनी प्रशासनाला न जुमानता साडेबारा फुटाच्या आत बांधकाम केले आहे.कोरची ग्रामपंचायत असताना कोरची अंतर्गत असलेले सर्व रस्ते मनरेगाअंतर्गत रुंदीकरण करून ठेवलेले होते. मात्र आता अतिक्रमण वाढले आ हे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी ७१ लाख २४ हजार रुपये खर्च करून नालीचे बांधकाम केले जात आहे. रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने रस्त्याच्या मध्यभागापासून केवळ पाच मीटर अंतरावर नालीचे बांधकाम सुरू आहे. अतिक्रमणधारकांना अभय देण्याचा प्रयत्न नगर पंचायतीकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे.कोरची शहराचा सिटी सर्वे करण्यात आला आहे. या सिटी सर्वेच्या आराखड्यानुसार रस्त्यांची रूंदी ठरवून नालीचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा