सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समाजातील निराधार व्यक्तींना अर्थसाहाय्य दिले जाते. संजय गांधी समितीला संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत १६ प्रकरणांपैकी १५ प्रकरणे मंजूर करण्यात आली, तर १ अर्ज नामंजूर करण्यात आला. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत प्राप्त ६ प्रकरणांपैकी ४ प्रकरणे मंजूर, तर २ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेंतर्गत प्राप्त ५ प्रकरणांपैकी ४ प्रकरण मंजूर करण्यात आली व १ प्रकरण नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेंतर्गत एक प्रकरण, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत चार प्रकरणे मंजूर करण्यात आली. बैठकीला संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार डी.एम. वाकुडकर, अव्वल कारकून एम.एच. मडावी, महसूल सहायक पीएफ खोबरागडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
निराधारांची २४ प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:33 IST