शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामे तत्काळ मार्गी लावा

By admin | Updated: June 25, 2016 01:24 IST

आमदार क्रिष्णा गजबे यांनी पंचायत समिती देसाईगंजच्या सभागृहात विकास कामांचा आढावा घेतला.

क्रिष्णा गजबे यांचे निर्देश : देसाईगंज तालुक्याचा घेतला आढावादेसाईगंज : आमदार क्रिष्णा गजबे यांनी पंचायत समिती देसाईगंजच्या सभागृहात विकास कामांचा आढावा घेतला. या आढावा सभेदरम्यान अपूर्ण असलेली कामे तत्काळ मार्गी लावावी, कामाची गती वाढवावी, असे निर्देश आ. गजबे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी दामोदर नान्हे, तहसीलदार अजय चरडे, पंचायत समिती सभापती प्रीती शंभरकर, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगरे, सहायक संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, नितीन राऊत, परसराम टिकले, शिवाजी राऊत, शांताबाई तितीरमारे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी यांच्यासह प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. सिंचनाची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जलयुक्त शिवार अभियान व रोहयोच्या माध्यमातून बोडी दुरूस्ती, तलाव दुरूस्ती, बंधारे आदींची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र त्यातील निम्म्याहून अधिक कामे पावसाळा जवळ आला असतानाही पूर्ण झाली नाही. त्यामुळे या कामांवर कोट्यवधींचा खर्च होऊनही चालू खरीप हंगामात सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार नसल्याने आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर कामे तत्काळ मार्गी लावावी, अशा सूचना केल्या. ग्रामपंचायत अंतर्गत अनेक नाल्यांचा उपसा करण्यात आला नसल्याची बाब आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामीण भागात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी नाल्यांचा उपसा करावा, असे निर्देश दिले. काम करताना अधिकाऱ्यांना येणाऱ्या समस्याही आमदारांनी जाणून घेतल्या. त्यांच्या सोबत यावर चर्चा केली. गावातील समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची असल्याने त्यांनी त्या समस्या सोडवाव्या. यासाठी शक्य झाल्यास स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश आ. क्रिष्णा गजबे यांनी दिले. सभा यशस्वीतेसाठी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.