शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिबील स्कोअर'मध्ये अडकले अन्न प्रक्रिया उद्योगांचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 15:11 IST

११६ उद्योग सुरू : कर्जाच्या ३५ टक्के मिळणार अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शेतमालाला स्थानिक स्तरावर चांगला भाव मिळण्यासोबतच रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे. या अंतर्गतचे काही अर्ज शेतकऱ्याचा सिबील स्कोअर खराब असल्यामुळे बँकांकडून नाकारले जात आहेत. ज्यांचा सिबील स्कोअर चांगला आहे. त्यांना मात्र बँका कर्जाचा पुरवठा करीत असल्याने उद्योग निर्मितीस मदत होत आहे. ११६ उद्योग सुरू झाले आहेत.

ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अजूनही शेतीवरच अवलंबून आहे. शेतीत तयार होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून विकल्यास दामदुप्पट किंमत मिळते; मात्र त्यासाठी प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारावी लागते. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. हा खर्च गरीब व्यक्तीला करणे शक्य होत नाही. 

ऐपत राहत नसल्याने त्यांना बँकाही कर्ज देत नाहीत. परिणामी व्यवसाय करण्याचे कौशल्य व जिद्द असूनही व्यक्ती उद्योग स्थापन करू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे व्यवसाय उभारणीसाठी बँक सुमारे ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देते. तसेच कर्जाचा जमानतदार सरकार स्वतः असते. त्यामुळे बँकाही कर्ज देण्यास तयार होत आहेत. इतर योजनांपेक्षा या योजनेचे अर्ज निकाली काढले जात आहेत. 

कोणास मिळतो लाभ? या योजनेंतर्गत १८ वर्षांवरील वैयक्तिक मालकी, भागीदारी, शेतकरी उत्पादक गट संस्था, कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतिशील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

कोणते उद्योग झाले सुरु

  • ही योजना कृषी विभागामार्फत राबवली जाते. योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच २९ जून २०२० पासून तर आजपर्यंत जिल्ह्यात ६११ प्रस्ताव प्राप्त झाले. २५५ प्रस्तावांना बँकांनी मजुरी दिली आहे. ११६ उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. 
  • जिल्ह्यात दालमिल, राइसमिल, बेकरी, मुरमुरा मिल, बारीक मसाला, खडा मसाला आदी उद्योग स्थापन करण्यात आले आहेत. शेतमालावर प्रक्रिया होऊ शकेल असा कोणताही उद्योग या योजनेंतर्गत स्थापन करता येतो, हे विशेष.

शासनाकडून काय मिळते ? शासन एकूण कर्ज रकमेच्या सुमारे ३५ टक्के किंवा १० लाख रुपयांपर्यंत अनुदान देते. कर्जाचा जमानतदार म्हणून सरकार असते.

"गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्यामुळे या ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यास खूपच वाव आहे. शेतकरी, बचत गट, शेतकरी कंपनी यांनी अर्ज करावेत. विशेष म्हणजे कर्जाची हमी सरकार घेत असते. त्यामुळे बँका कर्ज देण्यास तयार होतात; मात्र शेतकरी हा थकीत कर्जदार नसावा." - प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली