शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने नक्षल्यांकडून आणखी एका तरुणाची हत्या, १८ दिवसांत चौघांना संपविले

By संजय तिपाले | Updated: December 3, 2023 12:41 IST

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र काही केल्या थांबायला तयार नाही. दक्षिण गडचिरोलीत तीन तरुणांची हत्या केल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा  उत्तर गडचिरोलीकडे  वळवला आहे.

- संजय तिपाले गडचिरोली - जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र काही केल्या थांबायला तयार नाही. दक्षिण गडचिरोलीत तीन तरुणांची हत्या केल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा  उत्तर गडचिरोलीकडे  वळवला आहे. २ डिसेंबरच्या रात्री पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने एका तरुणाची गळा आवळून हत्या करत पत्रक सोडण्यात आले. मत तरुण एकेकाळी नक्षल्यांसाठीच काम करत होता हे विशेष.

सध्या नक्षलवाद्यांचा‘पीएलजीए’ सप्ताह सुरु आहे. पहिल्या दिवशी भामरागड तालुक्यात बॅनर व पत्रके टाकल्यानंतर मध्यरात्री नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील मुरकुटी येथील चमरा मडावी (३८) याची गळा आवळून हत्या करण्यात आली. तो पोलिस खबरी असल्याचा संशय नक्षल्यांनी मृतदेहाजवळ टाकलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.  चमरा हा पोलिस खबरी असून नक्षल्यांच्या नावावर त्याने अनेकांकडून पैसे गोळा केल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, चमरा मडावी हा नक्षल्यांचा समर्थक होता.दारूगोळा पुरवठा करण्यासाठी त्याने नक्षल्यांकडून मोठी रक्कम घेतल्याने त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक तपासानंतर नेमके कारण समजेल असे त्यांनी सांगितले.

चमराची बहीण, मेहुणाही नक्षल चळवळीत२०२१ साली चमरा मडावी यास नक्षल्यांना बंदुकीच्या गोळ्या पुरवठा करण्याचा तयारीत असताना छत्तीसगडमधील बालाघाट जिल्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याची बहीण जहाल नक्षलवादी डीव्हीसी मानसिंग होळी याची पत्नी असून ती सुद्धा नक्षल्यांच्या ‘एमएमसी’ झोनमध्ये विस्तार प्लाटून ३ मध्ये कार्यरत आहे. 

असे घडले हत्यासत्र १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे याची गोळ्या झाडून हत्या केली होती, २३ नोव्हेंबरला टिटोळा (ता.एटापल्ली) येथे पोलिस पाटील लालसू वेडदा यांना संपविण्यात आले.२४ नोव्हेंबरला कापेवंचा (ता.अहेरी)येथे रामजी आत्राम याची हत्या झाली तर २ डिसेंबरच्या रात्री चमरा मडावी (रा.मुरकुटी ता.कोरची) याचा नक्षल्यांनी गेम केला. चारही हत्या पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून झाल्या असून नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या या घटनांनी जिल्हा हादरुन गेला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली