शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भांडून मिळवावी लागली रूग्णवाहिका

By admin | Updated: December 25, 2014 23:31 IST

महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयात आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. या तालुक्यासाठी शासनाकडून टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध

सिरोंचातील प्रकार : अनेक महिन्यांपासून १०८ क्रमांकाची टोल फ्री रूग्णसेवा बंदचसिरोंचा : महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयात आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. या तालुक्यासाठी शासनाकडून टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात न आल्याने गंभीर स्वरूपाच्या रूग्णांना पुढील उपचारासाठी नेण्यास प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुरूवारी नागरिकांना आरोग्य यंत्रणेच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी भांडून बाळंत महिलेला अहेरी येथे नेण्यासाठी रूग्णवाहिका मिळवावी लागल्याचा प्रकार येथे घडला. गुरूवारला आसरअल्ली येथील गगुरी बनय्या ही महिला प्रसुतीसाठी आसरअल्लीवरून सिरोंचा येथे दाखल झाली. या महिलेची प्रसुती करण्यात आली. तिला दोन जुळे अपत्य झाले. आसरअल्ली येथून सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालयात आल्यावरही सदर बाळंत महिलेला आरोग्य सुविधा मिळाल्या नाही. सिरोंचा रूग्णालयात बाळाला ठेवायसाठी लागणारे आरोग्य उपकरण नसल्याने सिरोंचा रूग्णालयात नसल्याने या गरीब महिलेला दवाखाण्याबाहेर करून देण्यात आले व आपण अहेरी ग्रामीण रूग्णालयात जावे, असा सल्ला दिला. आसरअल्लीवरून पदरचे पैसे खर्च करून सिरोंचापर्यंत आलेल्या या महिलेजवळ पुढच्या प्रवासासाठी एकही पैसा नव्हता. सिरोंचा तालुक्यात राज्य सरकारची १०८ टोल फ्री सेवेची रूग्णवाहिका उपलब्ध नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ही रूग्णवाहिका लोकांना सेवा देत नाही. अशा परिस्थितीत दोन जुळ्या मुलांना घेऊन दवाखाण्याच्या परिसरात बसण्यापलीकडे या महिलेजवळ दुसरा पर्याय नव्हता. अखेरीस सिरोंचा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी ५००-५०० रूपये वर्गणीकरून ७ हजार रूपये जुळवून दिले व अहेरीपर्यंतची रूग्णवाहिका आरोग्य विभागाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांशी भांडून त्यांना मिळवून घ्यावी लागली. अधिकारी मानायला तयार नव्हते. अखेरीस कसेतरी करून त्यांनी या महिलेसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. परंतु हा नेहमीचाच त्रास असल्याने सिरोंचा तालुक्यातील नागरिक आरोग्यसेवेमुळे त्रस्त झाले आहे. शासन आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाचे अनेक दावे करीत असले तरी तालुक्यात मात्र कोणतीही आरोग्य सेवा येथे उपलब्ध नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.