शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय गुरूदेव आश्रमशाळा घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:37 IST

अहेरी तालुक्याच्या कमलापूरसारख्या अतिदुर्गम भागात वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी स्वालंबन व श्रमदानातून सन १९५८ मध्ये गुरूदेव आश्रशाळेचे स्थापना केली. मात्र सदर संस्था चुकीने हस्तांतरण झाल्यानंतर या आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देकमलापूर ग्रामपंचायतीची मागणी : पदाधिकारी मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना मंत्रालयात भेटले

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : अहेरी तालुक्याच्या कमलापूरसारख्या अतिदुर्गम भागात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वालंबन व श्रमदानातून सन १९५८ मध्ये गुरूदेव आश्रशाळेचे स्थापना केली. मात्र सदर संस्था चुकीने हस्तांतरण झाल्यानंतर या आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या आश्रमशाळेला शासकीय गुरूदेव आश्रमशाळा म्हणून घोषित करावी, अशी मागणी कमलापूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे.यासंदर्भात कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी, संतोष ताटीकोंडावार, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, विजय खरवडे, महेश मडावी व रूपा येजुलवार आदी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, तुकारामदादा गीताचार्य यांच्याकडे सदर गुरूदेव सेवा मंडळ शाळेच्या देखभालीचे काम होते. मात्र अचानक गुरूदेव सेवा मंडळातील जनार्धन गोथे या व्यक्तींनी सदर शाळा भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्था अहेरी यांच्याकडे चुकीने हस्तांतरित केली. तेव्हापासून गुरूदेव भक्तांनी अनेक आंदोलने केली. शाळा परत करतो, असे संस्थापकांनी शासन व प्रशासनाला खोटे आश्वासन दिले. मात्र ही शाळा अद्यापही गुरूदेव भक्तांना परत मिळाली नाही. तेव्हापासून या आश्रमशाळेमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पलंगची व्यवस्था नाही, संरक्षण भिंतीचा अभाव आहे, काही कर्मचाऱ्यांची पदमान्यता झालेली नाही. या समस्यांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.१३ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करणारकमलापूर येथील गुरूदेव आश्रमशाळा ही शासकीय गुरूदेव आश्रमशाळा म्हणून घोषित करण्यात यावी व गुरूदेव हे नाव बदलणार नाही, याची काळजी घ्यावी व येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थना मंदिराची देखभाल व दुरूस्ती शासनाने करावी, अशा मागणीचा ठराव कमलापूर ग्रामसभेने घेतला आहे. त्यामुळे ही शाळा शासकीय गुरूदेव आश्रमशाळा म्हणून घोषित करावी, अन्यथा १३ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदण्यात देण्यात आला आहे.

टॅग्स :Schoolशाळा