शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

घाेट : उडान उमेद महिला प्रभाग घोट-सुभाषग्राम अंतर्गत क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उमेद महिला ...

घाेट : उडान उमेद महिला प्रभाग घोट-सुभाषग्राम अंतर्गत क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उमेद महिला प्रभागाच्या अध्यक्ष नंदा चंदनखेडे, गीता पोगुलवार, सदस्य शशिकला चंदनखेडे, सुरेखा वैरागडे, सुगंधा मडावी, अनिता मिस्त्री, सुनिता मिस्त्री, रेखा वैरागडे उपस्थित होते.

आष्टी : येथील अंगणवाडी क्र. १ मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा हिवरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी सेविका मंजुषा मेश्राम, जीजाबाई कुबडे, अंगणवाडी मदतनीस सपना उंदीरवाडे उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रणय मेश्राम यांनी केले.

देसाईगंज : स्थानिक लहरी काॅम्प्लेक्समध्ये तालुका काॅग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष लतिफ रिझवी, युवक काॅग्रेस शहर अध्यक्ष पिंकू बावणे, महिला काॅग्रेसच्या तालुका अध्यक्ष आरती लहरी, पराग पांडव, मंगला चुंगडे, पल्लवी धनविजय, अंकित बुद्धे, सिमरन खोब्रागडे, गोपाल उईनवार, अक्षय दांडेकर, सचिन बन्सोड, आदित्य साळवे, काजल धनविजय उपस्थित होते.

जि. प. उच्च प्राथमिक शाळा कोरची : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने इयत्ता पहिली ते पाचवीकरिता भाषण व इयत्ता सहावी ते आठवीकरिता निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमलता तितिरमारे होत्या. प्रमुख पाहुणे अरविंद टेंभुरकर, विनोद भजने, कांता साखरे, प्रमोदिनी काटेंगे, मारोती अंबादे, आरती चांदेकर उपस्थित होते. याप्रसंगी बालिकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्रांतिसूर्य महात्मा जाेतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. यशस्वीतेसाठी आरती चांदेकर यांनी सहकार्य केले.

चामोर्शी : माडे मुधोली येथील साईलबिंबारामय बुद्ध विहारात क्रांतिवीर बिरसामुंडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले या शिक्षणप्रसारक, समाजसुधारक, प्रथमस्त्री शिक्षिका मुख्याध्यापिका होत्या, स्त्री शिक्षणाचे अनमोल कार्य केले, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले. याप्रसंगी प्रवीण मुंजमकर, राजेश खोब्रागडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मारोतराव मडावी तर आभार उज्ज्वला मेश्राम यांनी मानले.

चामाेर्शी येथे काॅंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अनुसूचित जाती विभागाच्या महिला जिल्हाध्यक्ष लताढाेक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निकिता बांबाेळे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर सचिवपदी वैशाली दासरवार, सहसचिव सुनंदा काेहळे तर सदस्यपदी दिव्या काेहळे, संगीता काेहळे यांची निवड करण्यात आली.

युवक काॅंग्रेस आरमाेरी : येथील प्रभाग क्रमांक ४ मधील राजेंद्र चाैकात क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक नीलेश अंबादे महासचिव युवक काॅंग्रेस, शहर अध्यक्ष सूरज भोयर, रुपेश जौजालाकर, मंगेश पाटील, संजय सोनवणे, प्रमोद कोल्हे, लेकराम मेश्राम, राजू कोल्हे, अजय नारनवरे, भूपेश वाकडे, निखिल दुमाने, रवी मेश्राम, खुशाल चाटाळे, खेमराज चाटाळे, जितेंद्र सोमनकर, राहुल हनवते,गणेश पेटकुले, सविता चिचघरे, भारती कोल्हे, वैशाली आकरे, दर्शना मेश्राम, ताराबाई मेश्राम, सुमन मेश्राम, उर्मिला पेटकुले, आनंदा कांबळे, मालन सहारे, अनिता सहारे, कल्पना साहारे, नंदा सोनवणे, वनिता जौजाळकर कविता मेश्राम, सोनू दिघोरे, योगिता ठाकरे, रीना लेंगुरे, निलिमा खोब्रागडे, अंजना कोल्हे, शालू मेश्राम उपस्थित होत्या.

बाॅक्स ......

सावित्रीमाईंचा जन्मदिन महिला मुक्तिदिन म्हणून साजरा करावा

शेकडाे वर्षांपासून स्त्री ही गुलामगिरीत जगत हाेती. स्त्रियांना या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सावित्रीमाई व जाेतिरावांनी संपूर्ण जीवन खर्ची घातले. त्यामुळे ३ जानेवारी हा सावित्रीमाईंचा जन्मदिन महिला मुक्तिदिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन निराशा गुरनुले यांनी केले. धानाेरा येथे माळी समाज महिला समितीच वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण सोनुले हाेत्या. मार्गदर्शक पीएसआय तेजस्विनी देशमुख, मानसी सोनुले, प्रमुख अतिथी म्हणून अर्चना लेनगुरे, रंजना सोनुले, वर्षा चिमुरकर, अल्का सहारे, शर्मिला मशाखेत्री, पायल तुलावी, मुकाजी भेंडारे, राजू मोहुर्ले, गिरीधर सोनुले उपस्थित होते. यावेळी गणेश मोहुर्ले व प्रतिमा मोहुर्ले या दाम्पत्याच्या सत्कार करण्यात आला. तालुकास्तरीय सत्यशोधक परीक्षा, फ्रि हॅन्ड रांगोळी, ठिपक्यांची रांगोळी व गीत गायन स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा निकेसर, प्रास्ताविक अरुणा सोनुले तर आभार रज्जू चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी जयश्री सहारे, नलू गुरनुले, चंदा सोनुले, पुष्पा ठाकरे, जास्वंदा गावतुरे, छाया भेंडारे, शीला आवळे, सुरेखा कोकोडे, प्रिया मांदाळे, मोना मांदाळे, वैशाली वाडगुरे, उज्ज्वला मोहुर्ले, शीतल निकोडे, सारिका शेन्डे, रेखा मोहुर्ले, गीता सहारे, राधिका ठाकरे, पोर्णिमा ठाकरे, सरला गुरनुले, मनीषा सोनुले, मालू गुरनुले, किर्ती गुरनुले, दर्शना निकेसर, प्रतिभा सहारे यांनी सहकार्य केले.

बाॅक्स ....

जनसंघर्ष समितीतर्फे सावित्रीच्या लेकींचा सत्कार

भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथे जन संघर्ष समिती नागपूर तर्फे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील कर्तृत्ववान १६ महिलांचा ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सत्कार समारंभाला जन संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता शिर्के, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी धम्मानंद मेश्राम, पंचायत समितीच्या सभापती गोईताई कोडापे, समितीचे सचिव पंकज धुर्वे, सेवानिवृत्त शिक्षक नारायण कोडापे, माजी सरपंच सुधाकर तिम्मा, प्रा. पराग सपाटे, रितेश बडवाईक, गोलू ठाकरे, महेश ढोबळे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व महिलांना साड्या भेट देण्यात आल्या. तसेच महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत गायन केले. कार्यक्रमाचे संचालन धनराज पोर्ते तर आभार रितेश बडवाईक यांनी मानले.

बाॅक्स .......

आरमोरीत युवारंगतर्फे जयंती साजरी

स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या, देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आरमाेरी येथे युवारंगतर्फे ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. इंदिरा नगर बर्डी येथील चाणक्य वाचनालयाच्या परिसरात सावित्रीबाई फुले महिला बचत गट, आरमोरी चाणक्य सार्वजनिक वाचनालय, आरमोरी व युवारंग यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता चौथी ते सातवीच्या अ गटात प्रथम क्रमांक गौतम बांबोळे, द्वितीय क्रमांक रोशन गेडाम व तृतीय क्रमांक समीक्षा नागापुरे तर इयत्ता आठवी ते बारावीच्या ब गटात प्रथम क्रमांक आरजू शेख, द्वितीय क्रमांक साहिल बारसागडे, तृतीय क्रमांक पूनम दुमाने यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. इंदिरानगर डोंगरी येथे कार्यक्रमाला मनीष राऊत, युवारंग क्लबचे संस्थापक व अध्यक्ष राहूल जुआरे, मीना साळवे, लक्ष्मी मंगरे उपस्थित होते. अरसोडा येथे कार्यक्रमाला बालकदास कोटरंगे उपस्थित होते. प्रगतीचौक बाजारपेठ येथे शालिनी गेडाम, श्रीरंग अलोने, जयकुमार मेश्राम, चारुदत्त राऊत, वनिता दुमाने, माला भोयर, कविता बेहरे उपस्थित होते. सिद्धार्थ वॉर्ड व टिळक चौक यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कलिराम गायकवाड, राहुल जुआरे उपस्थित होते. माना मोहल्ल्यात कार्यक्रमाला चंदा राऊत, जयकुमार मेश्राम, पुष्पा घरत उपस्थित होते. राम मंदिर वाॅर्डात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. उराडी येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी युवारंग कमिटीचे सदस्य उपस्थित होते.