लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा-आसरअल्ली दरम्यानच्या महामार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. मात्र सदर मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.सदर मार्गावर रस्त्याच्या जवळपास दोन ते अडीच फूट रूंदीचे व दीड फूट खोलीचे मोठे खड्डे पडले आहेत. अपघातात एखाद्या नागरिकाचा बळी गेल्यानंतर प्रशासन या रस्त्याची दुरूस्ती करणार आहे काय, असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत.अंकिसा गावाच्या सुरूवातीला असलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना खडतर प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकविताना अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. सदर मार्गाच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी कंत्राटदारामार्फत हाती घेण्यात आले. मात्र पावसाळा सुरू झाल्याने हे काम बंद ठेवण्यात आले. आता पावसाळा संपला असल्याने बांधकाम विभागाने काम सुरू करावे, अशी मागणी आहे.
अंकिसा-आसरअल्ली मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 00:02 IST
सदर मार्गावर रस्त्याच्या जवळपास दोन ते अडीच फूट रूंदीचे व दीड फूट खोलीचे मोठे खड्डे पडले आहेत. अपघातात एखाद्या नागरिकाचा बळी गेल्यानंतर प्रशासन या रस्त्याची दुरूस्ती करणार आहे काय, असा सवाल या भागातील नागरिक करीत आहेत. अंकिसा गावाच्या सुरूवातीला असलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना खडतर प्रवास करावा लागत आहे.
अंकिसा-आसरअल्ली मार्ग खड्ड्यात
ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : वाहनधारक कमालीचे त्रस्त