शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

संतप्त महिलांनी घेतली आष्टी पोलीस ठाण्यातच ग्रामसभा

By admin | Updated: June 1, 2016 02:01 IST

आष्टी परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्याबाबतचा ठराव तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पारित करण्यात आला होता.

११ दारूअड्डे बंद करा : फेब्रुवारीपासून केली होती मागणीआष्टी : आष्टी परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्याबाबतचा ठराव तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत पारित करण्यात आला होता. मात्र दारूविक्री बंद करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे ग्रामसभांकरिता जमलेल्या शेकडो संतप्त महिला पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यानंतर येथेच ग्रामसभा पार पडली. दरम्यान, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह महिलांनी आष्टी गावात सुरू असलेले ११ दारू अड्डे तत्काळ बंद करावे, तसेच आष्टी परिसरातून दारू पूर्णत: हद्दपार करावी, अशी मागणी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांच्याकडे केली. यापूर्वी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी आष्टी येथील जि. प. प्राथमिक शाळेत ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव पारित केला. मात्र तीन महिने उलटूनही अवैध दारूविक्रीस जोरात सुरू आहे. मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत ठराव पारित करूनही अवैध दारूविक्रीला आळा का घालण्यात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करून संतप्त महिला पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यामुळे पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली. याप्रसंगी प्रभारी ठाणेदार नितेश गोहणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंगटे, पोलीस हवालदार जसवंत बसू, गुरनुले, मिलींद पेलावार, अंबादास खेडकर आदी उपस्थित होते.ग्रामसभेला सरपंच वर्षा देशमुख, उपसरपंच नंदा डोर्लीकर, ग्रा. पं. सदस्य माया ठाकूर, ज्योत्सना मेश्राम, नम्रता कुकुडकर, विभा देठे, ग्रा. पं. सदस्य कपील पाल, बंडू कुबडे, आनंद कांबळे, गणेश चौधरी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी बी. डी. चौधरी, वच्छला वाघाडे, नंदा चांदेकर, ललीता झाडे, लीला ठाकूर, पौर्णिमा डोर्लीकर, कल्पना झाडे, रेखा कुबडे, ललिता औतकर, विद्या जुनघरे, लीला तिवाडे, शालिनी भसारकर, अनू कुबळे, लक्ष्मी बुर्ले, विमला मांडवगडे, दिवाकर कुंदोजवार, दीपक ठाकूर, व्यंकटी बुर्ले, संतोष सोयाम, जितेंद्र गलबले, रवी नामेवार, विजय नंदागवळी, ईश्वर बावणे, अक्षय कलाक्षपवार, राजकपूर गलबले, कालिदास मेश्राम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.