लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करताना येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी एज्जल देवकुले हिने सिकई मार्शल आर्ट स्ट्राईक प्रकारात एका मिनीटात १८१ ट्राईकची नोंद केली. एन्जल देवकुले हिने या प्रकारात विश्वविक्रमी झेप घेतली आहे. त्यानिमित्त जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन एन्जलचा सन्मान करण्यात आला. तसेच एन्जलचे प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांचाही सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या विश्वविक्रमाच्या नोंदीसाठी ग्लोबल रेकॉर्डचे मनमोहनसिंग रावत यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीत याबाबतची सर्व प्रक्रिया पार पाडली. यावेळी एसओएसच्या प्राचार्य उषा रामलिंगम, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, उपप्राचार्य निखील तुकदेव, क्रीडा विभाग प्रमुख शर्मिक वासनिक, विजय देवकुले, स्वाती देवकुले, मनोज देवकुले आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अमरीश उराडे यांनी केले तर आभार अर्चना चौधरी यांनी मानले.
एन्जलची विश्वविक्रमी झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:35 IST
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करताना येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी एज्जल देवकुले हिने सिकई मार्शल आर्ट स्ट्राईक प्रकारात ......
एन्जलची विश्वविक्रमी झेप
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या हस्ते सन्मान : एका मिनिटात १८१ स्ट्राईकची नोंद