प्राचीन हेमाडपंथी मंदिर दुर्लक्षित : आरमोरी शहराच्या मध्यभागातील रामसागर तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या पुरातन काळातील एकमेव हेमाडपंथी मंदिराची पुरातत्त्व विभागाने गतवर्षी संरक्षण भिंत बांधली व मुरूम टाकले. मात्र मंदिराची कोणतीही डागडुजी केली नाही. पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे येथील हेमाडपंथी मंदिराची दुरवस्था झाली आहे. मंदिराच्या बाहेर मूर्ती पडून आहे. पुरातत्त्व विभागाने या मंदिराच्या दुरूस्ती व सजावटीकडे लक्ष दिल्यास या मंदिराला गतवैभव प्राप्त होऊ शकते. यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.
प्राचीन हेमाडपंथी मंदिर दुर्लक्षित :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2015 00:52 IST