शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अमृत आहार योजनेची रक्कम हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:53 IST

सरपंच व अंगणवाडी कार्यकर्तींच्या नावे बँकेत असलेल्या संयुक्त खात्यातून परस्पर रक्कम लंपास केल्याची लेखी तक्रार चिंतलपल्लीच्या अंगणवाडी कार्यकर्ती अन्नपूर्णा मांडवे यांनी संबंधित बँक शाखेला दिली आहे.

ठळक मुद्देचिंतलपल्लीच्या मदतनिस महिलेचा प्रताप : अंगणवाडी कार्यकर्तीने केली पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सरपंच व अंगणवाडी कार्यकर्तींच्या नावे बँकेत असलेल्या संयुक्त खात्यातून परस्पर रक्कम लंपास केल्याची लेखी तक्रार चिंतलपल्लीच्या अंगणवाडी कार्यकर्ती अन्नपूर्णा मांडवे यांनी संबंधित बँक शाखेला दिली आहे. सदर तक्रारीची प्रत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व सिरोंचा पोलीस ठाण्यातही देऊन उचित कारवाईची मागणी केली आहे.कथीत गैरव्यवहार अंगणवाडी मदतनिस हेमलता तोटा हिने केल्याचा उल्लेख तक्रार निवेदनात नमूद आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिरोंचा शाखेत डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम या अमृत आहार योजना या शीर्षकांतर्गत २००८१००६७००४६३४ या क्रमांकाचे बचत खाते आहे. सदर संयुक्त खाते सरपंच अध्यक्ष सरीता तालपेल्ली व सचिव अंगणवाडी कार्यकर्ती अन्नपूर्णा मांडवे यांच्या नावाने आहे. शासनाकडून रक्कम जमा झाल्यावर सदर योजनेच्या विनियोगासाठी रक्कम काढताना अध्यक्ष व सचिव यांची स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. मात्र १७ नोव्हेंबर २०१६ ते ३० जून २०१७ या कालावधीतील विड्राल फार्मवर मी कधीच सही केली नाही. माझ्या सहीचा दुरूपयोग करून मदतनिस हेमलता हिने हा गैरव्यवहार केला. बँकेतून रक्कम काढण्यासाठी सादर कराव्याच्या विड्रालमागे रक्कम प्राप्तीच्या स्वीकृतीदाखल कथीत मदतनिसची सही आहे. सदर प्रकरणी स्थानिक वरिष्ठ कर्मचारी यांचा देखील सहभाग लक्षात येतो. या प्रकरणी सखोल चौकशी करून न्याय द्यावा, असेही कार्यकर्ती अन्नपूर्णा यांनी म्हटले आहे. दरम्यान मदतनिस महिलेचा पोलिसांनी समक्ष अभियान घेतला. मात्र पुढील कारवाई शुन्य आहे.या प्रकरणात बँकेच्या वरिष्ठ यंत्रणेकडूनही हालचाली नाही.अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या ताब्यात होते बँक पासबूकनोव्हेंबर २०१६ ते २०१७ पर्यंत नगरम बिटाच्या पर्यवेक्षिकेने सदर योजनेचे पासबूक स्वत:कडे ठेवले होते. अंगणवाडी कार्यकर्ती वरिष्ठ कार्यालयास तक्रार करणार असल्याची कुणकुण लागताच पासबूक परत केली. आहार वाटपासाठी किती रक्कम काढू, अशी विचारणा केल्यावर १४ हजार रूपये काढण्यास पर्यवेक्षीकेने सांगितले. त्यानुसार ३ नोव्हेंबर रोजी उक्त रक्कम काढण्यात आली. पासबूकमधील पूर्वीच्या नोंदी पाहिल्यावर गैरप्रकार लक्षात आला. १७ नोव्हेंबर २०१६ ते ३० जून २०१७ या काळात ५० हजार रूपये विड्राल झाले. सदर गैरव्यवहाराशी माझा संबंध नाही, असा कार्यकर्तीचे म्हणणे आहे.४पासबूक स्वत:च्या ताब्यात ठेवून पर्यवेक्षिका ही कार्यकर्तीला राजीनामा देऊन पद मोकळे करण्याचा दबाव टाकायची. त्यासाठी तिने एक लाख रूपयांची आॅफरही दिली. रिक्त झालेल्या पदावर मतदनिसला पदोन्नती देण्याचा यामागे डाव होता. दरम्यान आहार वाटप रजिस्टर, अंतिम शिल्लक रजिस्टर, इतर नोंदवह्यांसह व्हिझीट बुकेही गहाळ करण्यात आली. गावकºयांकडून खोट्या तक्रार घेऊन अंगणवाडी कार्यकर्तीला कार्यमुक्त करण्याचे षड्यंत्र य मागे आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता होत आहे. चौकशीनंतर सत्य उजेडात येण्याची दाट शक्यता आहे.