शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाआॅनलाईन केंद्रातून रक्कम काढा!

By admin | Updated: March 20, 2017 01:29 IST

येथील एसबीआय बँकेने १० हजारापेक्षा कमी रक्कम काढायची असेल तर बँकेत येऊ नका, तेवढी रक्कम

एटापल्ली एसबीआयचे निर्देश : १० हजारांपेक्षा कमी रोकड देण्यास नकार एटापल्ली : येथील एसबीआय बँकेने १० हजारापेक्षा कमी रक्कम काढायची असेल तर बँकेत येऊ नका, तेवढी रक्कम महाआॅनलाईन केंद्रामधून (सीएससी) काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा चांगलाच फटका ग्राहकांना बसत आहे. बँक कर्मचारी व महाआॅनलाईन केंद्राचे कर्मचारी यांच्यामध्ये साठगाठ असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. एसबीआय ही एटापल्ली तालुक्यातील पहिली व एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यामुळे इतर बँकांच्या तुलनेत या बँकेत सर्वाधिक खातेदार आहेत. ३० ते ४० किमी अंतरावरून नागरिक बँकेमध्ये येतात. त्यामुळे या बँकेत नेहमीच गर्दी राहते. मागील एक महिन्यांपासून या बँकेतील कर्मचाऱ्यांनी आपल्यावरील कामाचा भार कमी पडावा म्हणून १० हजारापेक्षा कमी रूपयांची रक्कम महाआॅनलाईन केंद्रातून काढा, असे सांगून ग्राहकांना परत पाठवित आहेत. या संदर्भात फलकावर तसेच कुठेही इतरत्र सूचना लिहिल्या नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही अशा प्रकारच्या सूचना बँकेला नाहीत. याबाबत बँक व्यवस्थापक संजय गोघाटे यांना विचारणा केली असता, ज्या ग्राहकांनी महाआॅनलाईन केंद्रातून खाते उघडले आहे. त्यांनाच फक्त त्याच केंद्रातून व्यवहार करण्यास सांगितले जात आहे, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. (तालुका प्रतिनिधी) बँकेची तक्रार पेटी पडली आहे कचऱ्यात बँकेबाबतच्या काही तक्रारी असल्यास त्या स्वीकारण्यासाठी प्रत्येक बँकेत तक्रार पेटी लावली जाते. या बँकेतील तक्रारपेटी मात्र एका कोपऱ्यात अडगळीत ठेवण्यात आली आहे. नागरिक या पेटीच्या सभोवताल खर्रा खाऊन थुकतात. यावरून नागरिकांच्या तक्रारीबाबत बँक फारशी गंभीर नसल्याचे दिसून येत आहेत. एटापल्ली येथील एसबीआय व सहकारी बँकेचे दोन एटीएम आहेत. सदर एटीएम मागील एक महिन्यापासून बंद आहेत. बँकेचे कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. या बँकेत कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत.