शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आधीच तुटपुंजे अनुदान, त्यात अन्नधान्यही बंद; वसतिगृह चालकांवर उधारी, उसनवारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 14:07 IST

दोन महिन्यांपासून पुरवठा ठप्प: अनुदानित संस्थांतील विद्यार्थ्यांची परवड, धान्य वितरण करण्याची मागणी; जिल्हा पुरवठा विभागाचा वरिष्ठांशी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपासून कल्याणकारी वसतिगृहांचा अन्नधान्य पुरवठा ठप्प आहे. परिणामी वसतिगृहचालकांवर उधारी, उसनवारी करून विद्यार्थ्यांना जेवणाची सोय करावी लागत आहे. आधीच तुटपुंज्या अनुदानामुळे संस्थाचालक हैराण आहेत, त्यात अन्नधान्यासाठीही पदरमोड करावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या कल्याणकारी संस्थांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सप्टेंबर २०२४ पर्यंत अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले होते त्याचे वाटपही तेव्हाच केले गेले. मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरीही अद्याप ऑक्टोबरचे अन्नधान्य मिळाले नाही. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे नियतन विनाविलंब अदा करावे, अशी मागणी आता संस्थांचालकांकडून होत आहे.

६० अनुदानित वसतिगृहे जिल्ह्यात आहेतशासनाकडे वसतिगृहचालकांच्या विविध मागण्या आधीच प्रलंबित आहेत. अतिशय तुटपुंज्या अनुदानात वसतिगृह चालविताना नित्याची कसरत होते. त्यातच शासनाकडून वेणारे धान्यही दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे वसतिगृहचालकांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. वासंदर्भात तातडीने उपाययोजना करावी. - वर्षा शेडमाके, जिल्हा कार्याध्यक्ष वसतिगृह संघटना

"कल्याणकारी वसतिगृहांसाठी वाढीव नियतन मंजुरीकरीता पाठपुरावा केलेला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचे वितरण आदेश प्राप्त झालेले नव्हते. मात्र, आता परवानगी मिळाली आहे. त्यामुळे वखार महामंडळाकडून धान्य उपलब्ध होईल. त्याचे विनाचिलब वितरण करू." - प्रकाश आघाव, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली