गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ५ आॅगस्टला ११ तालुक्यांमध्ये सरासरी ३०.२ मीमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. दिवसभर पावसाने उसंत घेतली असली तरी दुपारी १ वाजता भामरागड-आलापल्ली मार्गावरील पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने या मार्गावरची वाहतूक बंद झाली होती. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात गडचिरोली तालुक्यात ३९.७, कुरखेडा २१.५, आरमोरी २२.७, चामोर्शी २४.६, अहेरी १२, एटापल्ली ५५.५, धानोरा ५८.४, कोरची ३९.७, देसाईगंज ६.८, मुलचेरा १६.६ तर भामरागड तालुक्यात ६० मीमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी ३०.२ मीमी पाऊस झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ९३४.९ मीमी पाऊस झाला. जवळजवळ ६९ टक्के पाऊस आतापर्यंत झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख क्रिष्णा रेड्डी यांनी दिली आहे. शुक्रवारी दिवसभर मात्र पावसाने उसंत दिली. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात सर्वच भागात ३०.२ मि.मी. पाऊस
By admin | Updated: August 6, 2016 01:06 IST