शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:58 IST

एका कारसह रुग्णवाहिकेसारख्या बनविलेल्या वाहनातून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देदोन वाहने पकडली : एक्साईज विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एका कारसह रुग्णवाहिकेसारख्या बनविलेल्या वाहनातून देशी दारूची वाहतूक करण्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरूवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आणला. सदर दोन्ही वाहने आणि त्यातील दिड लाखांची दारू जप्त करण्यात आली.सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने विक्रेत्यांकडून चोरट्या मार्गाने इतर जिल्ह्यातून दारूची आयात केली जात आहे. एका वाहनातून दारू येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पंचांसह खासगी वाहनाने शंकरपूर-मोहगाव मार्गावर पाळत ठेवली असता पहाटेच्या सुमारास एक रुग्णवाहिका (एमएच ३५, ५२१५) येताना दिसली.संशय वाटल्याने त्या वाहनाला मोहगाव फाटा येथे अडवून झडती घेतली असता त्यात सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या ब्रॅन्डच्या ९० मिलीच्या ५८ पेट्या (४८०० बाटल्या) आढळल्या. त्यांची किंमत १ लाख २४ हजार ८०० रुपये आहे. याशिवाय वाहन (किंमत २ लाख ५० हजार) जप्त करण्यात आले.याच दरम्यान केलेल्या दुसऱ्या कारवाईत विठ्ठलगाव-पोटेगाव मार्गावर एमएच ४०, ए १६३ ही कार संशयितपणे येताना आढळली. त्या वाहनाची विठ्ठलगावजवळ झडती घेतली असता त्यात सुपर सॉनिक रॉकेट संत्रा या ब्रॅन्डच्या ९० मिलीच्या ८ पेट्या (८०० बाटल्या) आढळल्या. त्यांची किंमत २० हजार ८०० आहे. शिवाय वाहन (किंमत ७० हजार ८००) जप्त करण्यात आली.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक हारून शेख, सहायक दु.नि. जी.पी. गजभिये, एस.एम.गव्हारे, व्ही.पी.शेंदरे, व्ही.पी.महाकुलकर यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी