अहेरी : अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून एस. राममूर्ती यांनी ४ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्याकडे एसडीओ पदाबरोबरच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, एटापल्लीच्या एसडीओ पदाचा प्रभार सुध्दा सोपविण्यात आला आहे.यापूर्वी त्यांनी भारत सरकारच्या जमीन संधारण विभागात सहायक सचिव पदावर काम केले आहे. ते मूळचे तामिळनाडू राज्यातील आहेत. २०१३ च्या बॅच ते आयएएस अधिकारी आहेत. यावेळी लोकमतशी बोलताना एस. राममूर्ती यांनी सांगितले की, आपण आयएएस असलो तरी सामान्य नागरिकांच्या समस्या आपण प्राधान्याने सोडवू, जनतेने त्यांच्या आपल्याकडे मांडाव्या, जनतेच्या सेवेसाठी आपल्याला या ठिकाणी पाठविण्यात आले आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)
अहेरीला मिळाले आयएएस दर्जाचे एसडीओ
By admin | Updated: December 8, 2015 01:42 IST