शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

विदर्भ राज्यासह अहेरी जिल्हा निर्माण होणार

By admin | Updated: November 2, 2016 01:14 IST

अहेरी विधानसभा क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने मोठे आहे. गतीने विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.

शासनस्तरावर हालचाली वाढल्या : अम्ब्रीशराव आत्राम यांची पत्रकार परिषदेत माहितीअहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळाने मोठे आहे. गतीने विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणार आहे. या दिशेने भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत, अशी माहिती आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकारकडून दोन वर्षात झालेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी सोमवारी राजमहालात पत्रकार परिषद घेऊन मांडला. यावेळी ते बोलत होते. मागील सरकारच्या ३३ वर्षातील विकास कामाच्या तुलनेत भाजप-सेना युती सरकारने अतुलनीय कामगिरी केली आहे. विदर्भ राज्य निर्मितीस शासन कटिबद्ध असून माझ्याकडूनही याकरिता प्रयत्न सुरू आहे, असे ना. आत्राम यांनी सांगितले. जिल्ह्यात आवश्यक मोठ्या नद्यांवर व नाल्यांवर पूल निर्मिती तसेच सिंचन क्षेत्र निर्माण करणे तसेच महामार्ग निर्मिती करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. चामोर्शी, मुलचेरा तालुक्यातील बंगाली बांधवांना त्यांच्या जमिनजुमल्याचे प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी ओपीटीसी आदी माध्यमातून निधी उपलब्ध करावा लागणार आहे. जिल्ह्यातील आलापल्लीसह पाचही मॉडेल स्कूलकरिता अडीच कोटींचा निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. याशिवाय नागेपल्ली येथे ८.५० कोटी रूपयांच्या नळ योजनेचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. मार्र्कंडा तिर्थस्थळाचा विकास करण्यात येणार आहे. चिन्ना-वेट्रा सिंचन प्रकल्पाचे काम ८० टक्के झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही ना. आत्राम पत्रकार परिषदेत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व राज्यात विकासाचा झंझावात सुरू आहे. विविध नाविण्यपूर्ण योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेला नगरसेवक गिरीश मद्देर्लावार, अमोल गुडेल्लीवार, सय्यद मिसार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)मेडिगट्टा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीरसिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्पाच्या पाण्याने एकही घर बुडणार नाही. उलट या सिंचन प्रकल्पामुळे अहेरी व सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जवळपास २५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. या सिंचन प्रकल्पाचे पाणी उलट प्रवाहाने प्राणहिता नदीमार्गाने येणार असल्याने अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा होणार आहे. चव्हेला प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर अहेरी तालुका उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या समस्यापासून पूर्णत: मुक्त होणार आहे. देवलमरी, रेगुंठा, महागाव हे लघु सिंचन प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी सांगितले.सूरजागड लोह प्रकल्प जिल्ह्यातच होणारएटापल्ली तालुक्यातील सूरजागड लोह प्रकल्प परिसरात लायड मेटल कंपनीमार्फत लोह दगड उत्खननाचे काम करण्यात आले. यातून ३०० मजुरांना २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. सूरजागड लोह प्रकल्प एटापल्ली तालुक्यात अथवा अहेरी विधानसभा क्षेत्रातच उभारण्यात येणार आहे, अशी माहिती ना. आत्राम यांनी दिली. प्रकल्पाच्या अनुषंगाने एटापल्ली तालुक्यातील ५०० वर बेरोजगारांना आयटीआय प्रशिक्षणाची गरज आहे. गडचिरोली-सूरजागड लोह मार्गाचे सर्वेक्षण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.