शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी शहर व क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:57 IST

जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही, विकास कामांसाठी पक्षभेद व जातीभेद विसरून सर्वांनी सहकार्य करावे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आश्वासन : अहेरीच्या दसरा महोत्सवाची थाटात सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्याला आपण कदापी तडा जाऊ देणार नाही, विकास कामांसाठी पक्षभेद व जातीभेद विसरून सर्वांनी सहकार्य करावे. अहेरी शहरासह विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.अहेरी येथे आयोजित ऐतिहासिक दसरा महोत्सवात ते बोलत होते. संपूर्ण महाराष्टÑात प्रसिद्ध असलेल्या अहेरी येथील दसरा महोत्सवात घटस्थापनेपासून सतत नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची पालखी काढण्यात आली. ना.आत्राम पालखीत बसून जनतेला अभिवादन करीत गडदेवीची पूजा करायला अहेरीलगतच्या गडअहेरी येथे पोहोचले. त्यानंतर देवीची पूजाअर्चा त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर आपट्याचे पाने सोने म्हणून वाटण्यास प्रारंभ झाला. अहेरीच्या दसरा महोत्सवाला २०० वर्षांची परंपरा लाभली असून ना. आत्राम यांनी सुरुवातीला रूढी, परंपरा व संस्कृतीविषयी सविस्तर माहिती दिली. राजामाता रूख्मिणीदेवीच्या मार्गदर्शनात त्यांच्या आशीर्वादाने आपण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अहेरीचा दसरा महोत्सव हा केवळ राजपरिवाराचा नसून राजपरिवारावर प्रेम करणारा सर्व जनतेचाही आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रामुख्याने राजमाता रूख्मिणीदेवी, अवधेशबाबा आत्राम उपस्थित होते.दरम्यान जनतेला संबोधित करताना ना. आत्राम म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर अमडेली गावात वीज एकाचवेळी पोहोचली. आपण स्वत: महामंडळाच्या एसटीने अमडेली गावात प्रवास करीत पोहोचलो. तेथील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी तेथील नागरिकांनी गावातील विविध समस्या आपल्या पुढे मांडल्या.वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहो, कोणतीही समस्या ही एकाचवेळी मार्गी लागणार नाही. पुढील दोन वर्षात आपण या समस्या दूर करण्यासाठी शासनस्तरावर निधीची तरतूद करून त्या मार्गी लावण्यासाठी आपण पूर्ण करू, असेही ना. आत्राम यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसात आपण अहेरी शहराचा चेहरामोहरा बदलवून टाकणार, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सदर दसरा महोत्सवाला जवळपास २० हजारवर नागरिक उपस्थित होते. महाराष्टÑ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यासह गडचिरोली व विदर्भातील नागरिकांनी हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त सुरक्षा व्यवस्थेसाठी होता.अहेरी जिल्ह्याची घोषणा होणारस्वतंत्र अहेरी जिल्हा करण्यात यावा, ही आपली फार जुनी मागणी आहे. राजे विश्वेश्वरराव महाराज यांनीही स्वतंत्र अहेरी जिल्ह्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न येत्या काही दिवसात साकार होणार आहे. स्वतंत्र अहेरी जिल्ह्याची निर्मिती होण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली सुरू असून तशी तयारीही शासनाने चालविली आहे. यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. त्यापूर्वी अहेरी शहराचा विकास करण्यासाठी आपण गतीने प्रयत्न करू, असे ना. अम्ब्रिशराव आत्राम यावेळी म्हणाले.वनावर आधारित उद्योग निर्मिती करूगडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून अहेरी उपविभागाचा अधिकाधिक भाग जंगलव्याप्त आहे. या जिल्ह्यात पर्यावरण व वनावर आधारित उद्योग निर्मितीला चांगला वाव आहे. पर्यावरणाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून येथील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी वनावर आधारित उद्योग निर्माण करण्यात येतील, असेही ना. आत्राम यांनी यावेळी आश्वासित केले.