शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 27, 2014 23:28 IST

देसाईगंज शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्प मिळाले़ पम्प चालविण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतातील विजेसाठी डिमांडची रक्कम भरून दोन वर्षाचा कालावधी लोटला मात्र

दोन वर्ष लोटले : डिमांड भरले मात्र शेतकऱ्यांना विजेची जोडणी नाहीदेसाईगंज शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्प मिळाले़ पम्प चालविण्याकरिता शेतकऱ्यांनी शेतातील विजेसाठी डिमांडची रक्कम भरून दोन वर्षाचा कालावधी लोटला मात्र अजूनही शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत़ नैसर्गिक संकट आल्यास शेतकऱ्यांची पिके विजेअभावी करपण्याची भीती देखील वर्तविण्यात येत आहे़ शेतकऱ्यांच्या सर्वागिण विकासाकरीता शासन विविध योजना राबविते मात्र शासकीय योजनांचा फायदा कित्येक शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे़ शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांनी शेतात विहिरी बांधल्या. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटार पम्पही मिळाले़ मात्र विजेच्या जोडणीअभावी मोटारपम्प निरूपयोगी झाले आहेत़ शासन आपल्या अखत्यारीतील सर्वच विभागाला शेतकऱ्यांना सहकार्य राखण्याची भाषा बोलत असते़ मात्र शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनीमार्फत हाल होत असताना शासन केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे़ सन २०१३-१४ मध्ये तालुका कृषी विभागामार्फत ३१५ व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ९१ विजेवर चालणाऱ्या कृषी पम्पाचे वितरण करण्यात आले़ त्यापैकी अर्ध्यापेक्ष अधिक शेतकऱ्यांची पूर्वीचीच विजेची जोडणी आहे़ शेतातील कृषी पम्पाच्या नवीन वीज जोडणीकरिता मागिल दोन वर्षांपासून शेतकऱ्यांनी डिमांड भरलेला आहे़ दोन वर्षाचा कालावधी लोटूनही अजून पर्यंत शेतकऱ्यांना विजेची जोडणी मिळालेली नाही. जेष्ठता यादीनुसार कृषी पम्पाच्या जोडणीचे काम सुरू आहे असे वीज वितरण कंपनीने सांगितले आहे़ मात्र असे असतांना देखील वीज वितरण कंपनीकडे अजूनही १८० नविन कृषी वीज जोडणी शिल्लक आहे़ यावरून वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांच्या बाबतीत किती उदासीन आहे हे लक्षात येते़ पावसाळयात वीज जोडणी होऊ शकत नाही़ मात्र आॅक्टोबर पासून तर जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात विजेची जोडणी होऊ शकते. जेष्ठता यादीनूसार विजेची जोडणी होत असल्याचा गवगवा कंपनी करीत आहे़ मात्र ही जोडणी खरच त्यानुसार होते किंवा नाही या बाबत शेतकऱ्यांनी शहानिशा करणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांकडे विहीर, कृषी पम्प आहे. मात्र नैसर्गीक संकटामुळे शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासल्यास शेताला पाणी उपलब्ध होऊ शकत नाही पम्प असतानाही विजेअभावी शेतातील पिके करपण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे . (वार्ताहर)