शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

अगरबत्ती प्रकल्पात समन्वयकाकडून महिलांना मजुरीत फटका

By admin | Updated: April 10, 2016 01:36 IST

गडचिरोली येथे कार्यरत असताना तत्कालीन मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कुरखेडा येथील अगरबत्ती प्रकल्पात .....

महिलांची तक्रार : कलेक्टर व मुख्य वनसंरक्षकांना विचाराकुरखेडा : गडचिरोली येथे कार्यरत असताना तत्कालीन मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या कुरखेडा येथील अगरबत्ती प्रकल्पात काम करणाऱ्या महिला मजुरांना समन्वयकाकडून मजुरी वितरित करण्यात प्रचंड त्रास दिला जात असल्याची तक्रार महिलांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे ७ एप्रिल २०१६ रोजी केली आहे. कुरखेडा येथे मागील दीड वर्षांपासून वन कार्यालयाच्या माध्यमातून अगरबत्ती प्रकल्प (जीएपी) अंतर्गत सुरू आहे. येथे सध्या १८ महिला काम करीत आहेत. महिलांना २१.५० रूपये प्रती किलो या प्रमाणे अगरबत्ती तयार करण्याचा मोबदला देण्याचे ठरले आहे. त्यापैकी महिलांना १८ रूपये प्रती किलो प्रमाणे मजुरी स्वरूपात देऊन उर्वरित ३.५० रूपये सुपरवायझर यांना दिले जाते. महिन्याकाठी महिलांना सरासरी १७०० रूपये महिना मिळतो व सुपरवायझरला २३०० रूपये महिना मिळतो. ही मजुरी तुटपुंजी आहे. परंतु याव्यतीरिक्त मजुरीतून वेळोवेळी पैसे कपात करण्यात येतात. ही कपात कशाची याबद्दल जीएपीचे समन्वयक विनयकुमार यांना विचारणा केली, तर ते ‘वो मुझे पता नही, आप इसके बारे में कलेक्टर को पुछो या डीएफओ को पुछो’ असे उत्तर देतात. जानेवारी २०१६ च्या पेमेंटमधून अशाच प्रकारे १९०७ रूपये कपात करण्यात आले होते. अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वेळेवर पुरवठा होत नाही. त्यामुळे अगरबत्ती सेंटर बंद राहते. त्यामुळे महिला रिकाम्या बसून राहतात. याचा देखील मजुरीवर मोठा परिणाम होत असतो. तेव्हा कच्चा माल वेळेवर पुरवठा करण्याची व्यवस्था व्हावी, अशी विनंतीही महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जे काही आदेश कामासंबंधी देण्यात येतात. ते तोंडी न देता लेखी स्वरूपात देण्यात यावे, असेही महिलांनी म्हटले आहे. बरेच वेळा एकदा एक आणि दुसऱ्यांदा एक बाब सांगण्यात येत असते. येथे काम करणाऱ्या महिलांना १७०० ते १८०० रूपये प्रती महिना मजुरी मिळते. रोजगार हमी योजनेची मजुरी प्रती दिवस १८१ रूपये आहे. तेव्हा या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना रोहयो इतकी मजुरी मिळत नाही. कमीत कमी १५० रूपये मजुरी मिळायला पाहिजे, अशी मागणीही या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर महिलांच्या शिष्टमंडळाने कुरखेडा नगर पंचायतीच्या आरोग्य सभापती आशाताई जगदिश तुलावी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार भंडारी यांना निवेदन दिले.