शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याच्या खून प्रकरणात झालेल्या अटकेनंतर कोट्यवधींचा भूखंड घोटाळ्याप्रकरणी बहीण- भावाला केले अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 17:01 IST

कारनामे चर्चेत : बनावट संमतीपत्र देऊन मिळवला एन.ए.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगररचना विभागातील सहायक संचालक अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) हिला सासऱ्याच्या खून प्रकरणात झालेल्या अटकेनंतर जिल्ह्यातील भूखंड घोटाळा चर्चेत आहे. अशातच शहरात कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याचे एक प्रकरण उजेडात आले आहे. बनावट संमतीपत्राआधारे एन.ए. परवाना मिळवून भूखंडाची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी बहीण- भावाला ८ जुलै रोजी गडचिरोली पोलिसांनी अटक केली.

कंत्राटदार नागनाथ किसनराव भुसारे (रा. साईमंदिराजवळ, चामोर्शी रोड, गडचिरोली) असे तक्रारदाराचे नाव आहे. जयश्री आनंद चंद्रिकापुरे (रा. गडचिरोली) व विशालकुमार चंद्रकांत निकोसे (रा. गडचिरोली, ह.मु, हिंगणा, ता. नागपूर) या बहीण-भावांचा आरोपींमध्ये समावेश आहे. कंत्राटदार भुसारे यांच्या फिर्यादीनुसार, शहरातील सोनापूर येथील सर्वे क्र. १८/१ मधील ०.५१.५९ हेक्टर आर जमीन सुरेश नानाजी नैताम व इतर सामाईक शेतमालकांकडून खरेदीचा सौदा भुसारे यांच्यासह जयश्री चंद्रिकापुरे व विशालकुमार निकोसे यांनी मिळून केला होता.

रजिस्ट्रीसाठी पैसे कमी पडत असल्याने बहीण भावांनी भुसारे व मनोज प्रभूदास सूचक यांची भेट घेऊन सध्या रजिस्ट्रीसाठी तुम्ही रक्कम द्या व आम्हा बहीण भावाला हिस्सेदार ठेवा, असा प्रस्ताव ठेवला. त्यावर भुसारे व सूचक यांनी होकार दिला. भुसारे यांनी २४ लाख तर सूचक यांनी २४ लाख १३ हजार रुपये असे एकूण ४८ लाख १३ हजार रुपये उपलब्ध करून दिले.

२३ ऑगस्ट २०२२ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्री करून घेण्यात आली. ७/१२ मधील मूळ मालकाचे नाव कमी करून जयश्री चंद्रीकापुरे, विशालकुमार निकोसे, मनोज सूचक तसेच नागनाथ भुसारे अशा चौघांची नावे लावण्यात आली. मात्र, नंतर बहीण भावाने मिळून संमती न घेता येथे भूखंड पाडून त्याची प्रती प्लॉट ४० लाख रुपयांप्रमाणे विक्री सुरू केली. त्यासाठी त्या दोघांनी गडचिरोली मुख्याधिकाऱ्यांकडे जमीन अकृषक करण्याकरता भुसारे व सूचक या दोघांचे बनावट समंतीपत्र सादर करून नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

हिस्सेवाटणी न करता परस्पर भूखंड विक्रीचे करारनामे तयार करून भुसारे, सूचक यांच्यासह भूखंडधारकांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन ४ जुलै रोजी जयश्री चंद्रिकापुरे व विशालकुमार निकोसे यांच्यावर भारतीय दंड संहिता (बीएनएस) कलम ४६५,४६७, ४६८,४७१,४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दोघा बहीण- भावांना ८ जुलै रोजी अटक केली, अशी माहिती पो.नि. अरूण फेगडे यांनी दिली.

संमतीपत्राला मंजुरी देणारे मोकळेच दरम्यान, बहीण-भावांनी जमीन अकृषीसाठी प्रस्ताव सादर केला तेव्हा जोडलेले बनावट संमतीपत्र नगररचना विभागाने कसे काय मंजूर केले, असा प्रश्न या प्रकरणाने उपस्थित झाला आहे. मंजुरी देणारे अधिकारी अद्याप मोकळेच आहेत. पोलिस तपासात त्यांची चौकशी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारArrestअटकGadchiroliगडचिरोली