लोकमत न्यूज नेटवर्कपुराडा : परतीच्या पावसामुळे धानपिकाचे नुकसान होत असतानाच आता पुन्हा या पिकावर तुडतुडा रोगाने कहर केला आहे. उभे धानपीक करपताना बघून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.पुराडा परिसरात प्रामुख्याने जड धानाची लागवड केली जाते. हे धान आता निघण्याच्या मार्गावर असताना या पिकावर तुडतुडा रोगाने थैमान घातले आहे. तुडतुडा रोगामुळे धानपीक करपायला लागले आहे. दोन वर्षांपूर्वी तुडतुडा रोगाने जिल्ह्यात कहर केला होता. हजारो हेक्टरवरील धानपीक नष्ट झाले होते. याच्या आठवणी शेतकऱ्यांना आहेत. तशीच परिस्थिती यावर्षी उद्भवल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे धानपिकाला लोंबे आली आहेत. ती परिपक्व होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच तुडतुडा रोगाने थैमान घातले आहे. रोग आटोक्यात यावा, यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करीत आहेत. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शेती उत्पादनाचा खर्च वाढत असताना दुसरीकडे उत्पादनात फार मोठी घट होणार आहे. दरदिवशी पाऊस कोसळत असल्याने फवारलेली औषधी काम करीत नाही. परिणामी रोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. एका शेतातील रोग दुसºया शेतात पसरत आहे. एक-एक करून संपूर्ण परिसरातील धान तुडतुडा रोगाच्या छायेत येत आहे.एकीकडे परतीच्या पावसामुळे धान भिजून नुकसान होत आहे तर दुसरीकडे तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. काय करावे, हे कळेनासे झाले आहे. कृषी सहायकांनी रोगाची पाहणी करून योग्य तो सल्ला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
परतीच्या पावसानंतर आता धानावर तुडतुड्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST
तुडतुडा रोगामुळे धानपीक करपायला लागले आहे. दोन वर्षांपूर्वी तुडतुडा रोगाने जिल्ह्यात कहर केला होता. हजारो हेक्टरवरील धानपीक नष्ट झाले होते. याच्या आठवणी शेतकऱ्यांना आहेत. तशीच परिस्थिती यावर्षी उद्भवल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे धानपिकाला लोंबे आली आहेत. ती परिपक्व होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच तुडतुडा रोगाने थैमान घातले आहे.
परतीच्या पावसानंतर आता धानावर तुडतुड्याचा हल्ला
ठळक मुद्देउत्पादन कमालीचे घटण्याची शक्यता : फवारणी करूनही रोग आटोक्यात येईना