राज्य शासनाच्या नियोजन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार नामनिर्देशित सदस्य म्हणून अहेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांची नियुक्ती केली आहे. तसेच विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, आरमोरीच्या कल्पना तिजारे, राष्ट्रवादीच्या कोट्यातून पक्षाचे प्रदेश पदाधिकारी ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, देसाईगंजचे मो.युनूस शेख तसेच काँग्रेसच्या कोट्यातून जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, जि.प.सदस्य ॲड.रामभाऊ मेश्राम आणि कुरखेडा येथील जीवन नाट यांचा समावेश आहे. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत किंवा शासनाकडून सदर नियुक्त्या रद्द होईपर्यंत त्या अबाधित राहतील.
राज्यातील यापूर्वीच्या भाजप सरकारच्या कार्यकाळातही जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे समितीवरील नामनिर्देशिक सदस्यच नियोजनात सहभागी होत असल्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर निधीचे नियोजन करताना सर्वांना समान न्याय मिळत नव्हता अशी ओरड सुरू होती. सदर नियुक्त्यांमुळे जिल्हा निधीच्या नियोजनात सदर सदस्यांना प्रत्यक्ष सहभागी होता येईल.