शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचे अस्थिविसर्जन करून नववधू चढली बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:33 IST

कन्यादान करण्याचे भाग लाभणे सर्वांच्याच नशिबी नसते. ज्याला हे भाग्य लाभते त्या पित्याला आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद नक्कीच लाभतो. अशाच आनंदात मुलीच्या लग्नाची तयारी करत असलेल्या वडिलाचा ऐन लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोरचीतील घटना : लग्न दोन दिवसांवर असताना वडिलांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कन्यादान करण्याचे भाग लाभणे सर्वांच्याच नशिबी नसते. ज्याला हे भाग्य लाभते त्या पित्याला आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद नक्कीच लाभतो. अशाच आनंदात मुलीच्या लग्नाची तयारी करत असलेल्या वडिलाचा ऐन लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला. पण ते दु:ख गिळून त्यांच्या लेकीने सकाळी वडिलांचे अस्थिविसर्जन करून सायंकाळी बोहोल्यावर चढण्याचा निर्णय घेतला.ही कहानी आहे कोरचीतील विजय बोरकर (५०) व त्यांची मुलगी राणी यांची. गडचिरोली नजीकचा पोर्ला येथील मूळचे रहिवासी असलेले बोरकर कुटुंबीय २० वर्षांपूर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी कोरचीला आले आणि येथेच स्थायी झाले. कोरचीच्या त्रिमूर्ती वाचनालयाच्या बाजूला शासकीय जागेत झोपडी बांधून ते राहात होते. कुटुंबात पत्नी व एक मुलगी असा छोटासा संसार होता. विजय बोरकर हे टिनटप्पर गोळा करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. पत्नी दुसऱ्याच्या घरची भांडीकुंडी घासून पतीला हातभार लावायची. त्यांना राणी नामक एकुलती एक मुलगी आहे. कुरखेडा तालुक्यातील लेंढारी येथील अनिल शेंडे या युवकाशी तिचा विवाह ठरला. ३० मे रोजी संध्याकाळी विवाहाचा मुहूर्त निघाला. रात्रदिवस राबुन, आहे त्याच परिस्थितीत एकुलत्या एक मुलीचे लग्न चांगल्याप्रकारे लग्न लावण्याची मनोमन इच्छा बाळगून विजय बोरकर कामाला लागले. पण कन्यादान करणे त्यांच्या नशिबीच नव्हते. नियतीने ऐनवेळी घात केला आणि त्यांच्यावर काळाने एकाएकी झडप घातली.हात पिवळे होण्याआधीच पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी मुलीवर आली. २९ मे रोजी मंडप पूजन होते. त्यानंतर गुरूवारी ३० मे रोजी सकाळी पित्याचे अस्थिविसर्जन केल्यानंतर संध्याकाळी दु:ख उराशी बाळगून ती बोहल्यावर चढली.हळदीने पिवळे झालेले मुलीचे हात बघण्याची इच्छा विजयची होती. तिच्या लग्नातील आनंदासाठी फार मोठे काबाडकष्ट सहन केले. मात्र मुलीचा आनंदलेला चेहरा बघण्याचे भाग्य अभागी पित्याला लाभले नाही. तर सासरी जाताना वडिलाच्या कुशीत मन हलके करण्याचे भाग्यही राणीला लाभले नाही.अन् स्वप्न अधुरेच राहिलेमुलीच्या लग्नात आवश्यक असणाºया गोष्टी झाल्या का? अजून कशाची गरज आहे? असे प्रश्न ते आपल्या अर्धांगिनीला विचारत होते, तर कधी आपल्या लाडल्या मुलीला काही पाहिजे काय? अशीही विचारणा करीत होते. जसजशी लग्नाची तारीख जवळ येत होती, तसतशी बापाला चिंता भेडसावत होती. लग्न पत्रिका वाटप करण्याबरोबरच इतर कामे करणेही गरजेचे होते. ती कामे करीत असतानाच २८ मे रोजी संध्याकाळी विजय बोरकर यांचा उष्माघाताने मृत्यु झाला.

टॅग्स :marriageलग्न