बऱ्याच वर्षांनंतर मागणी पूर्ण : रांगी गावात नागरिकांनी केले बसचे स्वागतरांगी : राज्य परिवहन महामंडळाच्या ब्रह्मपुरी आगारामार्फत ब्रह्मपुरी-आरमोरी-वैरागड-रांगी-धानोरा अशी बसफेरी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. अनेक वर्षानंतर या मार्गे बससेवा सुरू झाल्याने रांगी येथे सदर बस पोहोचताच प्रवाशी व नागरिकांनी या बसचे स्वागत केले. ब्रह्मपुरी आगारातून सदर बस सकाळी ८ वाजता निघते. सकाळी ११ वाजता आरमोरी-वैरागड-रांगी मार्गे धानोरा येथे पोहोचते. शुक्रवारी सदर बस रांगी येथे पोहोचल्यावर नागरिकांनी बसचे स्वागत केले. यावेळी शशिकांत साळवे, काशिनाथ भुरसे, नरेंद्र भुरसे, लाल खॉ पठाण, देवराव कुनघाडकर, कावळे, बसवाहक भैरव गराडे, चालक रमाकांत अरगेलवार आदी उपस्थित होते.सदर बसफेरी नव्याने सुरू झाल्यामुळे रांगी, धानोरा परिसरातील नागरिकांना थेट ब्रह्मपुरी येथे जाण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. सदर बसफेरीमुळे ब्रह्मपुरी येथे जाऊन वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा घेण्यास रांगी परिसरातील नागरिकांना सोयीचे होणार आहे, अशी प्रतिक्रिया स्वागतप्रसंगी रांगीवासीयांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
अखेर रांगीमार्गे ब्रह्मपुरी बससेवा सुरू
By admin | Updated: May 15, 2016 01:05 IST