शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बाधित ७४ शेतकरी अर्थसहाय्यापासून वंचित

By admin | Updated: June 15, 2017 01:36 IST

तालुक्यातील कुंभीटोला, कुरखेडा या दोन गावांची खरीप हंगाम २०१५ च्या पिकांची ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी होती.

२०१५ च्या हंगामात ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी लोकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : तालुक्यातील कुंभीटोला, कुरखेडा या दोन गावांची खरीप हंगाम २०१५ च्या पिकांची ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी होती. त्यामुळे या दोन गावांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र बाधित ७४ शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून अर्थसहाय्य मिळाले नाही. त्यामुळे अर्थसहाय्य घेण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी या दोन गावातील ७४ शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १५ जानेवारी २०१६ च्या पत्रानुसार कुरखेडाच्या तहसीलदारांकडे बाधित शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र शासनाचे निर्देश बाजूला सारून प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य न देता शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात शासनाने चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कुरखेडा येथील शेतकरी नरेशचंद्र नाकाडे, भास्कर देशमुख, राजीराम देशमुख, वामदेव सोनकुसरे, विस्तारी भानारकर, बालकदास चांदेवार आदींनी केली आहे.