लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोरचीपासून चार किमी अंतरावर असलेल्या भीमपूर नाल्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाल्याने रविवारी दुपारच्या सुमारास वाहतूक ठप्प पडली होती.शनिवारपासून कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारीही सकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोरची ते बोटेकसा मार्गे छत्तीसगडकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. भीमपूर नाल्यावरील पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर पूल पाण्यात बुडते व काही काळ वाहतूक ठप्प राहते. रविवारी दुपारी या नाल्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती.कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी यांना माहिती मिळताच त्यांनी प्रशासकीय चमूसह नाल्याजवळ पोहोचले. परिस्थितीची पाहणी केली. काही वेळानंतर पुलावरील पाणी उरतले व वाहतूक सुरळीत झाली. या नाल्यामुळे भीमपूर, धमदीटोला, सोहले, सोहलेटोला, झेंडेपार, नांदळी, जैतानपार, नवबापूर, मर्केकसा, खिरूटोला, खुर्शीपार, हेटाळकसा, कोटरा, बिहिटेकला, बोटेकसा, रामसाय टोला, घुगवा, हितकसा या गावांचा संपर्क तुटते. नाल्यावर लवकरच उंच पूल बांधले जाईल, असे आश्वासन तहसीलदार भंडारी यांनी दिले.कोरची तालुक्यात ५१ टक्के पावसाची तूटकोरची तालुक्यात यावर्षी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. या तालुक्यात १ जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत ८६६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ ४२१ मिमी पाऊस झाला आहे. कमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची रोवणीची कामे खोळंबली होती. पावसाने आता जोर धरल्याने धान रोवणीच्या कामांना वेग येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भीमपूर नाल्याने अडविला कोरची मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:00 IST
शनिवारपासून कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारीही सकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोरची ते बोटेकसा मार्गे छत्तीसगडकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. भीमपूर नाल्यावरील पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर पूल पाण्यात बुडते व काही काळ वाहतूक ठप्प राहते.
भीमपूर नाल्याने अडविला कोरची मार्ग
ठळक मुद्देवाहतूक खोळंबली : कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस; कमी उंचीच्या पुलांमुळे दरवर्षी बसते फटका