शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘गडचिरोली लाईव्ह’मधून मिळणार प्रशासकीय सूचना व माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

नागरिकांसाठी आवश्यक अशा सूचना, शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती तसेच नागरिकांशी संवाद साधणे व त्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. या उद्देशाची पूर्तता व्हावी म्हणून गडचिरोली लाईव्ह या ॲपचा वापर जिल्ह्यातील नागरिकांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी दिलेल्या मुलाखतीत केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना, हवामान व नैसर्गिक आपत्ती संदर्भातील आवश्यक सूचना तसेच विविध योजनांची माहिती लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी ॲप विकसित केले आहे. ‘गडचिरोली लाईव्ह’ असे या ॲपचे नाव असून त्याचे लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या ॲपचा जिल्ह्यातील नागरिकांना चांगला उपयोग होईल, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘गडचिरोली लाईव्ह’ या रेडिओ ॲपची सुरुवात करण्यात आली. सूचना, संवाद व ज्ञानगंगा अशा विषयांचा समावेश या ॲपमध्ये असेल. नागरिकांसाठी आवश्यक अशा सूचना, शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती तसेच नागरिकांशी संवाद साधणे व त्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. या उद्देशाची पूर्तता व्हावी म्हणून गडचिरोली लाईव्ह या ॲपचा वापर जिल्ह्यातील नागरिकांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी याप्रसंगी दिलेल्या मुलाखतीत केले. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांना प्रशासनातील विविध माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात दोन डिजिटल स्क्रीन बसविलेल्या आहेत, त्याचेही उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगरू डॉ.प्रशांत बोकारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

एफएम रेडिओ स्टेशनची गरज-    जिल्हा प्रशासनाने तयार केलेले ‘गडचिरोली लाईव्ह’ हे ॲप अतिशय उपयोगाचे ठरणारे आहे. पण त्यासाठी स्मार्ट फोनसह इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात स्मार्ट फोनचा वापर आणि इंटरनेट अजूनही पुरेशा प्रमाणात नाही. त्यासाठी हायस्पिड इंटरनेटचे जाळे वाढविण्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. -    यासोबतच केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयांतर्गत गडचिरोलीत एफएम रेडिओ स्टेशनची उभारणे करणे गरजेचे आहे. विदर्भात केवळ नागपूर आणि यवतमाळ येथेच एफएम रेडिओ स्टेशन आहेत. गडचिरोलीत एफएम रेडिओ स्टेशन सुरू झाल्यास दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत शासन व प्रशासनाचे संदेश, योजना सहजपणे पोहोचविणे शक्य होणार आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे